India T20 World Cup squad News Marathi
India T20 World Cup squad News Marathi sakal
क्रिकेट

Team India Squad : दिग्गज खेळाडूने T20 World Cupसाठी केली टीम इंडियाची घोषणा; या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

Kiran Mahanavar

Team India T20 World Cup 2024 Squad : बीसीसीआय लवकरच आयपीएल 2024 दरम्यान टीम इंडियाची घोषणा करू शकते. यादरम्यान भारताचा माजी दिग्गज खेळाडू इरफान पठाणने आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे.

इरफानने आपल्या संघात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना स्थान दिले आहे. पण काही खेळाडू असे आहेत ज्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये संजू सॅमसन आणि केएल राहुल हे दोन मोठे खेळाडू आहेत ज्यांना इरफान पठाणने त्याच्या T20 वर्ल्ड कप संघात समाविष्ट केले नाही.

सलामीवीर म्हणून इरफान पठाणने आपल्या संघात कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जैस्वालची निवड केली आहे. तो म्हणाला की, यशस्वी जैस्वाल आयपीएलपूर्वीही भारतीय संघासाठी कामगिरी करत होता आणि त्यामुळेच त्याची निवड आवश्यक आहे.

त्याचबरोबर त्याने विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ठेवले आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आणि पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंतची निवड केली आहे.

याशिवाय इरफानने रिंकू सिंगची निवड केली आहे. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोघांची अष्टपैलू म्हणून निवड करण्यात आली आहे. या सोबत त्याने आपल्या संघात तीन फिरकीपटूंची निवड केली आहे. रवींद्र जडेजा व्यतिरिक्त त्याने युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची निवड केली आहे.

चहल आणि कुलदीप या दोघांनीही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इरफान पठाणने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड केली आहे. तर शुभमन गिलचीही बॅकअप सलामीवीर म्हणून निवड झाली आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी इरफान पठाणने निवडलेला भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि शुभमन गिल.

(Irfan Pathan picks Indian team for T20 World Cup)

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाबाबत सातत्याने अटकळ बांधली जात आहेत. कोणाची निवड होणार आणि कोण नाही याबाबत रोज नवनवीन बातम्या येत आहेत. आयपीएल 2024 च्या आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारे परिस्थिती बऱ्याच अंशी स्पष्ट झाली आहे. असे काही खेळाडू आहेत ज्यांचे संघातील स्थान निश्चित झाले आहे. पण टीममध्ये कुणाची निवड होईल हे संघाची घोषणा झाल्यावरच कळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT