Rohit Sharma | Team India T20 Jersey Sakal
Cricket

Rohit Sharma: फक्त रोहितचाच जलवा! सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडियाची T20 जर्सी लाँच, पण हार्दिककडे दुर्लक्ष, पाहा Video

Team India T20 Jersey: बीसीसीआयने नुकताच भारतीय संघाच्या नवा टी20 जर्सी अनावरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Pranali Kodre

Team India T20 Jersey: जून 2024 मध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. हा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाच्या नव्या टी20 जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. या नव्या जर्सीचे अनावरण अहमदाबामधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर करतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दिसत आहे.

दरम्यान, भारताच्या नव्या मुख्य टी20 जर्सीचे अनावरण काही दिवसांपूर्वीच आदिदासने केले होते. पण नुकताच बीसीसीआयचे जो व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात भारतीय संघाची नवी सराव जर्सी, जॅकेट, टी-शर्ट असे इतर मर्चंडाईज देखील दिसत आहे.

तसेच रोहितनेही जो टी-शर्ट यावेळी घातला आहे, तो पांढऱ्या रंगाचा असून त्यावर बीसीसीआयचे लोगो, तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक ड्रीम इलेव्हनचा लोगो, त्याचबरोबर भारतीय संघाचे किट स्पॉन्सर आदिदासचाही लोगो दिसत आहे.

तथापि, या संपूर्ण व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा दिसत आहे, मात्र यात भारतीय टी20 संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या नसल्याची चर्चा होत आहे.

कशी आहे भारताची टी20 जर्सी?

भारताची मुख्य टी20 जर्सीचे अनावरण 6 मे रोजीच करण्यात आल आहे. भारतीय खेळाडू सामन्यादरम्यान घालणार असलेली जर्सी निळ्या आणि केशरी अशा दोन रंगाची आहे.

पुढच्या बाजूने आणि मागून निळ्या रंगात ही जर्सी असून हाताला केशरी रंग आहे. तसेच आदीदासची ओळख असलेले पांढरे पट्टेही खांद्यावर आहेत. तसेच गळ्याला केशरी, पांढरा आणि हिरवा असे भारताच्या तिरंग्यातील रंग आहेत. ही जर्सी भारतीय संघ आगामी टी२० वर्ल्ड कपमध्ये घालणार आहे.

टी20 वर्ल्ड कप 1 ते 29 जून 2024 दरम्यान खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध 5 जून रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

SCROLL FOR NEXT