Rahul Dravid Sakal
Cricket

Rahul Dravid: टी20 वर्ल्ड कप विजेता कोच द्रविडशी करार करण्यास उत्सुक असू शकतात 'हे' 4 आयपीएल संघ

Rahul Dravid: द्रविड यांचा भारतीय संघाबरोबरचा कार्यकाळ आता संपला असल्याने आयपीएलमधील फ्रेंचायझी त्यांना आपल्या संघाशी जोडण्यासाठी उत्सुक असू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Dravid: भारताचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ दमादार अंदाजात संपला. भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 आपल्या नावावर केला. फायनलचा सामना राहुल द्रविड यांच्यासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून अखेरचा होता.

खरंतर त्यांना 2023 पर्यंतच प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं होतं परंतु, रोहित शर्माने त्यांना टी-20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत राहावे यासाठी मनवलं होतं, ज्याचा उल्लेख द्रविड यांनी त्यांच्या सांगता समारोहात केला. आता ते आयपीएल २०२५ साठी ४ फ्रेंचायजीच्या निशाण्यावर असू शकतात, जे त्यांना प्रमुख प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देऊ शकतात.

आयपीएल २०२५ सुरू होण्यासाठी अजून खुप वेळ आहे, परंतु, वेळ निघून जाण्याआधी फ्रेंचायजी आपल्यामध्ये सामील करून घेण्यासाठी आतुर असतील.

द्रविड परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी आपला कार्यकाळ थांबवत असले तरी त्यांना आयपीएल स्पर्धेत चांगले मानधन मिळू शकते.

कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स ह्या 4 फ्रेंचायजी आयपीएल 2025 पूर्वी राहुल द्रविडला जोडू शकतात.

1.कोलकाता नाईट रायडर्स

गौतम गंभीर हे कोलकाता नाईट रायडर्सचे मेंटर आहे. जर ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले तर गंभीरला केकेआरमधून आपले पद सोडावे लागेल. अशा परिस्थितीत केकेआरमध्ये ते पद रिक्त असल्यास, शाहरुख खान राहुल द्रविडशी संपर्क साधून त्याला मुख्य प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाची भूमिका सोपवू शकतात.

2. राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्समध्ये कोणतीही जागा रिक्त असल्याचे दिसत नसले तरी, फ्रँचायझी नव्या हंगामासाठी त्यांचे माजी कर्णधार आणि महान खेळाडू राहुल द्रविड यांना संघाशी जोडू शकतात. द्रविड यापूर्वीही राजस्थानच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते.

3. रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर

विराट कोहली आणि राहुल द्रविड यांच्यातील चांगले संबंध अनेकदा पाहायला मिळाले आहे. याशिवाय आरसीबीने कधीही विजेतेपद पटकावले नाही, त्यामुळे नवीन हंगामापूर्वी ते राहुल द्रविडसोबत करार करू शकतात. त्याचे मूळ गावही बेंगळुरू आहे, तसेच द्रविड यापूर्वी या संघाकडून खेळलाही आहे.

4. दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सची कामगिरीत सातत्य दिसत नाहीये. अशात सध्याचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनाही आपले पद सोडावे लागू शकते. जर ते पद रिक्त झाले तर दिल्ली फ्रँचायझी द्रविडशी संपर्क साधू शकते, कारण दिल्लीचे क्रिकेट संचालक आणि मार्गदर्शक सौरव गांगुली आहेत आणि गांगुली व द्रविड चांगले मित्र देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Vijay Pandit : अपयशातून घडविले खाकीचे नवे शिलेदार! विजय पंडित यांना १३ वेळा अपयश, तरीही ४० जणांना वर्दीचे धडे

Raj Thackeray : जिथे जाल तिथे मराठीतच बोला; राज ठाकरे यांनी मांडला 'स्वप्नातील महाराष्ट्र'

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

SCROLL FOR NEXT