Virat Kohli celebrates aggressively after dismissing Shubman Gill
esakal
Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Marathi Update : एक वादग्रस्त निर्णयामुळे विराट कोहलीचा पारा किती चढू शकतो, हे आज पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात विराट जरा जास्तच आक्रमक भूमिकेत दिसला. रजत पाटीदारला चुकीच्या निर्णयाने बाद दिल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा स्टार फलंदाज आधीच तापला होता. शुभमन गिलचा झेल टिपल्यानंतर त्याने साजरे केलेले आक्रमक सेलिब्रेशन त्याला किती राग आलाय, हेच सांगणारा होता.