Pat Cummins Wife 
Cricket

Pat Cummins Wife : तुझ्या पत्नीवर प्रेम करतो... भारतीय चाहत्याच्या कमेंटवर कमिन्सने दिली भन्नाट प्रतिक्रिया

Valentine Day Pat Cummins Wife : व्हॅलेंटाईन डे दिवशीत चाहत्याने पॅट कमिन्ससोबत केला खोडसाळपणा

अनिरुद्ध संकपाळ

Pat Cummins Wife Valentine Day : क्रिकेटपटू असो वा कोणत्याही खेळातील स्टार खेळाडू असोत. त्यांना सोशल मीडियावर ट्रॉलिंगचा सामना हा करावाच लागतो. WTC चॅम्पियनशिप अन् वनडे वर्ल्डकप जिंकून देणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सलबाबत देखील असाच एक किस्सा झालाय. मात्र पॅट कमिन्स हे प्रकरण अत्यंत हुशारीने हातळाले. एका चाहत्याने भारतीय असल्याचे सांगत कमिन्सच्या पोस्टवर कमेंट केली. त्याने कमिन्सला थेट त्याच्या पत्नीवर प्रेम करत असल्याचे सांगितले. त्यावर कमिन्सने दिलेली प्रतिक्रिया देखील भन्नाट होती.

पॅट कमिन्सने पत्नी बेकीसोबत एक सुंदर फोटो शेअर केला. त्याने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ही इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. या फोटोत हे स्टार कपल एका सुमद्र किनाऱ्यावर निवांत क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. या पोस्टला कमिन्सने 'सुपर मॉम, पत्नी आणि माझी व्हॅलेंटाईन आणि नक्कीच एक प्रो सर्फर देखील, हॅप्पी व्हॅलेंटाईन बेकी किमिन्स' असे कॅप्शन दिले होते.

कमिन्सची ही पोस्ट काही काळातच तुफान व्हायरल झाली. त्याच्या पोस्टखाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट्सचा पाऊस पडला. यात एका चाहत्याची देखील कमेंट होती. हा चाहता स्वतःला भारतीय म्हणत होता आणि तो कमिन्सला म्हणत होता की मी तुझ्या पत्नीवर प्रेम करतोय. यावर कमिन्सने त्याला एक भन्नाट उत्तर दिलं. तो म्हणाला की मी तुझा मेसेज तिच्यापर्यंत पोहचवतो.

कमिन्ससाठी 2023 वर्ष हे स्वप्नवत गेलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला.

कमिन्सला यंदाचा आयसीसी पुरूष क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याच्यावर भारतीय प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात विक्रमी बोली लागली. त्याला 20.5 कोटी रूपये मिळाले आहेत. सनराईजर्स हैदराबादने त्याच्यावर ही मोठी बोली लावली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिंदेंच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेटी टांगती तलवार, निवडणूक शपथपत्रात दिली खोटी माहिती

NEET Paper leak Case: नीट पेपरफुटीप्रकरणी महिलेला अटक; बिबवेवाडीतील मनिषा वाघमारे पोलिसांच्या ताब्यात; विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचविल्याचा संशय!

बाबो...! सिद्धार्थ जाधवची पत्नी आहे बिजनेसवुमन, स्वत:चा व्हिला आणि बरंच काही

Public Wifi Risk : पब्लिक Wi-Fi वर चुकूनही करू नका 'ही' 3 कामे, नाहीतर काही सेकंदांत होईल अकाऊंट बँक रिकामं, मोबाईल हॅक

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात जोरदार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT