Rohit Sharma | India vs Sri Lanka 1st ODI Sakal
Cricket

IND vs SL, ODI: What, You tell me! माझ्याकडे काय पाहातोस? रोहित शर्माचा मजेशीर Video पाहिलात का?

India vs Sri Lanka 1st ODI, Rohit Sharma Video: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत रोहित शर्माने संघसकाऱ्यांशी डीआरएसबद्दल बोलत असताना एक मजेशीर प्रतिक्रिया दिली, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Viral Video: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. वनडे मालिकेला शुक्रवारी (२ ऑगस्ट) सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, या सामन्यातील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

खरंतर रोहित शर्मा मैदानात अनेकदा मजेशीर कमेंट करताना दिसतो. त्याच्या या कमेंट्स बऱ्याचदा स्टप माईकमध्येही कैद होतात. अशीच एक घटना या सामन्यातही झाली.

झाले असे की २९ व्या षटकात भारताकडून वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत होता. त्यावेळी श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालागे फलंदाजी करत होता. त्याच्याविरुद्ध भारताने पायचीतसाठी अपील केले. मात्र, पंचांनी नाबाद असल्याचे सांगितले.

त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाकी खेळाडूंना काय करायचं असं विचारताना दिसले, त्यावर मागून काही सांगता येत नाही असं सांगितल्यानंतर त्याने यष्टीरक्षक केएल राहुलला विचारले, त्यावर त्याला खात्री नसल्याचे दिसून आले. त्यानंतर रोहितने गमतीशीर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'तू मला सांग, माझ्याकडे काय पाहातोय, सगळं मीच करू का?'

रोहितची ही प्रतिक्रिया स्टम्प माईकमध्ये कैद झाली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान, भारताने रिव्ह्यु घेतला नाही.

सामन्याबद्दल सांगायचं झाले, तर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद २३० धावा केल्या. श्रीलंकेकडून पाथम निसंकान ५६ धावांची खेळी केली, तर दुनिथ वेल्लालागेने ६५ चेंडूत ६७ धावांची खेळी केली.

भारताकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT