Virat Kohli Anushka Sharma attend Krishna Das kirtan in London sakal
Cricket

Virat Kohli Krishna Das kirtan: लंडनमध्ये कीर्तन अन् चर्चा भारतात... रॉकस्टार योगीच्या रंगात रंगले अनुष्का आणि विराट!

Anushka Sharma-Virat Kohli attend Krishna Das' 'kirtan' in London: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण ना अनुष्का शर्मा आले ना विराट कोहली.

Kiran Mahanavar

टी-20 वर्ल्ड कपपासून विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसोबत लंडनमध्ये वेळ घालवत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण ना अनुष्का शर्मा आले ना विराट कोहली.

या सगळ्या दरम्यान अनुष्का आणि विराट भारतातून लंडनला शिफ्ट झाल्याची अफवा पसरली आहे. लंडनला जाण्याच्या अफवांच्या दरम्यान, अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे.

अनुष्का शर्माने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीमध्ये फोटो शेअर केले आहेत. हे फोटो ना अनुष्काचे आहेत ना विराट कोहलीचे. अभिनेत्रीने कृष्ण दास यांच्या कीर्तनाचे फोटो शेअर केले असून त्यांना सोशल मीडियावर टॅगही केले आहे.

अनुष्का शर्मा विराट कोहली आणि कुटुंबासह लंडनला शिफ्ट झाल्याच्या बातम्यांदरम्यान, अभिनेत्रीची नवीनतम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते लंडनमध्ये कृष्ण दास यांच्या कीर्तनात सहभागी होत असल्याचे सांगण्यात येत होते.

कृष्ण दास कोण आहे?

कृष्ण दास यांना 'योगाचा रॉक स्टार' म्हटले जाते. ते पारंपारिक भारतीय भजन आणि समकालीन संगीत यांचे मिश्रण करतात. त्यांचे खरे नाव जेफ्री कागेल आहे आणि त्यांनी 1960 च्या दशकात भारत प्रवास करून आणि नीम करोली बाबा यांचे शिष्य बनून त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू केला. विराट आणि अनुष्का दोघेही नीम करोली बाबाचे भक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT