Who Is Jeffrey Vandersay News Marathi sakal
Cricket

IND vs SL : एक, दोन, तीन नाही पठ्ठ्याने टीम इंडियाच्या ६ खेळाडूंची केली शिकार, कोण आहे जेफ्री वँडरसे?

Who Is Jeffrey Vandersay News : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 2nd ODI : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 240 धावा केल्या. पण भारताचा डाव केवळ 208 धावांवर आटोपला. श्रीलंकेने भारताचा 32 धावांनी पराभव केला, पण श्रीलंकेच्या एका पठ्ठ्याने 7 षटकात 6 विकेट घेतल्या होत्या.

होय, या खेळाडूचे नाव जेफ्री वँडरसे आहे, जो लेगस्पिनर गोलंदाज आहे. त्यामुळे श्रीलंका 3 वर्षात प्रथमच भारतावर विजय मिळवून शकली. त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांच्या विकेट घेतल्या.

दुखापतग्रस्त लेगस्पिनर वानिंदू हसरंगाच्या जागी जेफ्री वँडरसेला दुसरा एकदिवसीय सामना खेळण्याची संधी देण्यात आली होती आणि त्याने निवडकर्त्यांना निराश केले नाही. शेवटचे जेफ्री वँडरसे कोण आहेत ते जाणून घेऊया?

श्रीलंकेचा गोलंदाज जेफ्री वँडरसे 34 वर्षांचा असून तो केवळ 37 सामने खेळला आहे. टीम इंडियाविरुद्धचा हा त्याचा दुसरा सामना होता. उजव्या हाताचा वँडरसे टॉप स्पिन, गुगली आणि स्लाइडरसह विविध फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी करतो. त्याने 3 अर्धशतके झळकावताना जवळपास एक हजार धावा केल्या आहेत. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला 2015 मध्ये सुरुवात झाली.

पहिला सामना 30 जुलै 2015 रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला गेला, जो टी-20 सामना होता. या सामन्यात त्याने 4 षटकात 25 धावा दिल्या. 28 डिसेंबर 2015 रोजी, वँडरसेने क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण काल खेळला गेलेला सामना भारत विरुद्ध जेफ्री वँडरसेचा दुसरा सामना होता.

जेफ्री वँडरसे यांना 2018 मध्ये एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. त्याच्यावर कराराचा भंग केल्याचा आरोप होता. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कडक कारवाई केली होती. त्याला निलंबित करताना 20 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्याच्यावर सामन्याच्या आदल्या रात्री गुपचूप हॉटेलमधून बाहेर पडून मित्रांसोबत नाईट क्लबमध्ये एन्जॉय केल्याचा आरोप होता. तो रात्रभर नाईट क्लबमध्ये राहिला. तक्रार आल्यानंतर कारवाई करून त्याला श्रीलंकेला परत पाठवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT