Indian Women Team X/BCCIWomen
Cricket

Women's Asia Cup 2024: भारतीय संघ सेमीफायनलच्या उंबरठ्यावर, UAE विरुद्ध दणदणीत विजय

India vs UAE Women: महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने युएईला पराभूत करत सेमीफायनलमधील स्थान जवळपास पक्के केले आहे.

Pranali Kodre

Women's Asia Cup 2024, India vs UAE: महिला आशिया कप २०२४ स्पर्धेत रविवारी (२१ जुलै) भारतीय संघाने संयुक्त अरब अमिराती (UAE) 78 धावांनी विजय मिळवला.

हा भारतीय महिला संघाचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. त्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे. तसेच युएईचे मात्र आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्यांचा हा या स्पर्धेतील दुसरा पराभव होता.

या सामन्यात भारतीय संघाने युएईसमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईला २० षटकात 7 बाद 123 धावा करता आल्या.

भारतीय संघाने दिलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईची फारशी चांगली सुरुवात झाली नव्हती. रणुका सिंग ठाकूर, पुजा वस्त्राकर आणि दिप्ती शर्मा यांनी सुरुवातीलाच मोठे धक्के त्यांना दिले होते. त्यांनी ३६ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या होत्या.

पण त्यानंतर कर्णधार ईशा ओझाला काविशा एगोडागेची साथ मिळाली. त्यांनी ४० धावांची भागीदारी केली. मात्र, असे असले तरी त्यांना धावगती नियंत्रित ठेवता आली नाही. त्याचच पदार्पण केलेल्या तनुजा कन्वरने ईशाला ३८ धावांवर माघारी धाडले.

एका बाजूने काविशाने लढत होती. मात्र काही कोणाकडूनही तिला साथ मिळाली नाही. त्यामुळे अखेर युएईला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारताकडून दिप्ती शर्मा हिने २ विकेट्स घेतल्या, तर रेणुका ठाकूर, तनुजा कन्वर, पुजा वस्त्राकर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी युएईने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते.भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद २०१ धावा केल्या.

भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. तसेच ऋचा घोषने २९ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ६४ धावा ठोकल्या. याशिवाय शफाली वर्माने १८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली.

युएईकडून काविशा एगोडागेने २ विकेट्स घेतल्या. तसेच समायरा धंधारका आणि हीना होतचंदानी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT