Women's T20 World Cup 2024 Sakal
Cricket

Cricket World Cup इतिहासात प्रथमच असं घडलं; भारत सोडा युरोप-आशियाचा एकही संघ सेमीफायनलमध्ये नाही

Women's T20 World Cup 2024 Semifinal: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील अंतिम चार संघांवर शिक्कामोर्तब झाले असून त्यांच्या सेमीफायनलचे सामने कुठे आणि कधी होणार आहेत, जाणून घ्या.

Pranali Kodre

Women's T20 World Cup 2024: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील साखळी फेरी मंगळवारी (१६ ऑक्टोबर) संपली. अखेरचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने ६ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे या विजयासह वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले, तर इंग्लंडचे आव्हान संपले.

या सामन्यानंतर उपांत्य फेरीत प्रवेश करणारे अंतिम ४ संघ निश्चित झाले आहेत, तर ६ संघांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. आव्हान संपलेल्या ६ संघांमध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे. भारताशिवाय पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लड, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांचेही आव्हान साखळी फेरीत संपले.

तसेच ए ग्रुपमधून आस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आणि बी ग्रुपमधून वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ विजेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार ठरले आहेत.

यामुळे कोणत्याही प्रकारच्या वर्ल्ड कपमध्ये (महिला, पुरुष, १९ वर्षांखालील) असे पहिल्यांदाच झाले आहे की युरोप आणि आशिया खंडातील एकही संघ उपांत्य फेरीत खेळणार नाही.

अंतिम ४ संघांची कामगिरी

साखळी फेरीत ए ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि भारत या चारही संघांना पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले.

तसेच न्यूझीलंडने भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या संघाविरुद्ध विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव स्विकारला. त्यामुळे ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या ग्रुपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारत, चौथ्या क्रमांकावर पाकिस्तान आणि पाचव्या क्रमांकावर श्रीलंका राहिले.

बी ग्रुपमध्ये वेस्ट इंडिजने पहिला क्रमांक पटकावला. त्यांनी साखळी फेरीत स्कॉटलंड, बांगलादेश आणि इंग्लंड या संघांना पराभूत केलं, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना पराभूत व्हावं लागलं.

दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि बांगलादेश या संघांविरुद्ध विजय मिळवले, तर इंग्लंडविरुद्ध पराभव स्विकारला, यासह दक्षिण आफ्रिका या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड, चौथ्या क्रमांकावर बांगलादेश आणि पाचव्या क्रमांकावर स्कॉटलंड राहिले.

उपांत्य फेरीतील सामने

दरम्यान, आता १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला उपांत्य सामना १७ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता दुबईमध्ये सुरू होईल.

तसेच दुसरा उपांत्य सामना १८ ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड संघात शारजाह येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल.

या दोन्ही सामन्यातील विजेते खेळाडू रविवारी (२० ऑक्टोबर) विजेतेपदासाठी अंतिम फेरीत खेळतील. अंतिम सामना दुबईमध्ये होणार आहे.

महिला टी२० वर्ल्ड कप बाद फेरी वेळापत्रक

उपांत्य फेरी

  • १७ ऑक्टोबर - पहिला सामना : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वा.)

  • १८ ऑक्टोबर - दुसरा सामना : वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह (वेळ - संध्या. ७.३० वा.)

अंतिम सामना

  • २० ऑक्टोबर, दुबई (वेळ - संध्या. ७.३० वा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृ्त्यू

SCROLL FOR NEXT