england beat west indies in 2nd test sakal
Cricket

WTC Standings : इंग्लंडची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी झेप; पाकिस्तानची उडवली झोप

World Test Championship standings - इंग्लंडने नॉटिंगहॅम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेतली

Swadesh Ghanekar

WTC standings ENG vs WI 2nd Test : इंग्लंडने दुसऱ्या कसोटीतही निर्विवाद वर्चस्व गाजवताना वेस्ट इंडिजवर २४१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरी कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे इंग्लंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत मोठी झेप घेताना पाकिस्तानचं टेंशन वाढवलं आहे.

या कसोटीपूर्वी इंग्लडचा संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर होता, परंतु दुसरी कसोटी चौथ्या दिवशी जिंकून त्यांनी तीन स्थान वर झेप घेतली. फिरकीपटू शोएब बशीरने ( ५-४१) कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या फिरकीसमोर ३८५ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेला वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १४३ धावांत तंबूत परतला.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजने ४५७ धावा केल्या. पण, इंग्लंडने दुसऱ्या डावात जो रूट ( १२२) व हॅरी ब्रूक ( १०९) यांच्या शतकाच्या जोरावर ४२५ धावा केल्या. वेस्ट इंडिजसमोर ३८५ धावांचे लक्ष्य ठेवले गेले, परंतु त्यांना १४३ धावा करता आल्या. बशीरच्या ५ विकेट्ससह ख्रिस वोक्स व गस अॅटकीसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयासह इंग्लंडने WTC Standings मध्ये तीन स्थान वर झेप घेताना सहावा क्रमांक पटकावला. ३१.२५ टक्क्यांसह इंग्लंड सहाव्या क्रमांकावर आहे आणि ३६.६६ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानचं त्यांनी टेंशन वाढवलं आहे.

भारतीय संघ अव्वल...

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत भारतीय संघ ६८.६५ टक्क्यांसह अव्वल स्थानावर कायम आहे. भारताने ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत, तर २ मध्ये हार पत्करावी लागली आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया ( ६२.५०) आहे, तर न्यूझीलंड ( ५०) व श्रीलंका ( ५०) हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT