CSK Supremo S Srinivasan accused Sourav Ganguly For non-performance esakal
क्रीडा

BCCI President Election : CSK चे सर्वेसर्वा श्रीनिवासन यांनी गांगुलीची गेम केली?

अनिरुद्ध संकपाळ

BCCI President Election Sourav Ganguly S Srinivasan : सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुलीला सर्वोच्च न्यायालयाच्या अनुकूल निर्णयानंतरही अध्यक्षपदाची दुसरी टर्म देण्यात येणार नाहीये. बीसीसीआयची सर्वसाधार वार्षिक बैठक ही 18 ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान, सौरभ गांगुली दुसऱ्या टर्मसाठी इच्छूक असून देखील त्याला विरोध करण्यात आला. हा विरोध करण्यात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्जचे सर्वेसर्वा एस. श्रीनिवासन आघाडीवर होते अशी माहिती पीटीआयने दिली.

सौरभ गांगुली बीसीसीआय अध्यक्षपद सोडण्यास तयार नव्हता. मात्र त्याला पद सोडण्यास भाग पाडण्यात आल्याने तो खूप निराश झाला आहे. माध्यमांमध्ये सौरभ गांगुलीला बीसीसीआय अध्यक्षपदाऐवजी IPL चेअरमन पदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र सौरभ गांगुलीने याला नकार दिला. दरम्यान, भारतीय निवडसमितीचे माजी सदस्य रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला. बीसीसीआयचे सध्याचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या गोष्टीला दुजोरा देत ही निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत देखील दिले.

पीटीआयली बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 'सौरभ गांगुलीला IPL चेअरमन पदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने ती नम्रपणे नाकारली. त्याला बीसीसीआयचे अध्यक्षपद भुषवल्यानंतर त्याच्यात उपसमितीत पद भुषवायचे नव्हते. त्याने 11 ऑक्टोबरला नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत पुन्हा बीसीसीआय अध्यक्षपद भुषवण्याची इच्छा व्यक्त केली.'

मात्र याच बैठकीत एस. श्रीनिवासन यांनी भारताच्या माजी कर्णधारावर अकार्यक्षम म्हणत टीका केली. सौरभ गांगुलीने बीसीसीआयच्या ब्रँडला धक्का पोहचवला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. या घटनाक्रमानंतरच सौरभ गांगुली हा पुरेसा पाठिंबा न मिळाल्यामुळे बीसीसीआयचा अध्यक्ष होणार नाही अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : द्राक्षबागेची बिकट अवस्था पाहून उगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT