Danushka Gunathilaka esakal
क्रीडा

Danushka Gunathilaka : ऑस्ट्रेलियन कोर्टाने श्रीलंकेच्या क्रिकेटपटूची बलात्काराच्या आरोपातून केली निर्दोष मुक्तता, काय होतं प्रकरण?

अनिरुद्ध संकपाळ

Danushka Gunathilaka : ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपदरम्यान श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुणतिलका याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात त्याला निर्दोष ठरवण्यात आले आहे. 32 वर्षाच्या दनुष्कावर सिडनी येथील महिलेवर तिच्याच घरात हल्ला केल्याचा आरोप होता. दनुष्का तिच्या घरी टिंडर डेटवर गेला होता.

सुरूवातीला या प्रकरणात महिलेने दनुष्कावर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप केला होता. मात्र नंतर फक्त महिलेची परवानगी न घेता कंडोम काढल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी न्यू साऊथ वेल्समध्ये केस दाखल झाली होती.

दरम्यान, न्यू साऊथ वेल्स जिल्हा न्यायालयात चार दिवस सुनावणी झाली. आरोप करणाऱ्या महिलने दनुष्कासोबत फक्त सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी परवानगी दिली असल्याचे सांगितले. यावेळी श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी कंडोम काढल्याचे पाहिले नाही असे महिलेने सांगितले. मात्र काही वेळातच ते जमिनीवर पडल्याचे दिसले.

तसेच महिलेने गुणतिलकावर जबरदस्तीने चुंबन घेतल्याचाही आरोप केला होता. यावेळी ती खूप गुदमरली असल्याचेही तिने सांगितले. मात्र गुणतिलकाने आपला बचाव करताना हे सर्व आरोप फेटाळले. यावेळी त्याने ही महिला अनेकवेळा खोटी बोलली आहे. तिने आपली स्टोरी अनेकवेळा बदलली असल्याचे सांगितले.

या प्रकरणात न्यायाधीश सारा हुग्गेट यांना गुणतिलकाने पोलिसांना सर्व खरं सांगितल्याचे आढळून आले. त्याने सेक्स करताना कंडोम काढले नव्हते. त्याला अशी करण्याची संधी मिळाली नसल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले.

क्रिकेटपटूने त्याला पोलिसांनी विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याने जे काही सांगितले आहे ते नाकारण्यात आणि त्याच्यावर विश्वास न ठेवण्याचे कोणतेच कारण दिसत नाहीये असेही न्यायाधीश सारा म्हणाल्या.

दुसरीकडे आरोप करणाऱ्या महिलेने पोलिसांना दोन वेगवेगळ्या घटना सांगितल्या. तिला नक्की काय झालं आहे हे स्पष्टपणे काही आठवत नव्हते असेही न्यायालयाचे म्हणणे आहे.

गुणतिलकाने श्रीलंकेकडून 100 पेक्षा जास्त सामने खेळलेल आहेत. यात आठ कसोटी सामन्यांचा देखील समावेश आहे. बलात्काराच्या आरोपानंतर त्याच्यावर स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती.

न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर तो पत्रकारांना मुलाखत देताना म्हणाला की, 'माझं आयुष्य आता पुन्हा सामान्य होणार आहे त्यामुळे मी आनंदी आहे. आता मी क्रिकेट खेळण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही.'

न्यू साऊथ वेल्सने गुणतिलकावर आरोप लागण्यापूर्वी 5 महिने आधीच लैंगिक संबंधावेळी संमतीशिवाय कंडोम काढण्याबाबत (Stealthing) कडक कायदा केला होता. त्यानंतरची ही सर्वात हाय प्रोफाईल केस ठरली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT