David Warner announced as captain of Dubai Capitals sakal
क्रीडा

David Warner : आता टी-20 लीग गाजवणार डेव्हिड वॉर्नर! 'या' फ्रँचायझीचा झाला कर्णधार

Kiran Mahanavar

David Warner announced as captain of Dubai Capitals : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने टी-20 क्रिकेटचा रोडमॅप तयार केला आहे. त्याची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती सर्वश्रुत आहे. पण आता त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीलाही रामराम ठोकला आहे.

वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, निवृत्तीनंतर तो जगभरातील अनेक टी-२० लीगमध्ये सहभागी होणार आहे. निवृत्तीपूर्वी दिल्ली कॅपिटल्सची उपकंपनी दुबई कॅपिटल्सने डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदी निवड केली.

डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय टी-20 लीग (ILT20) मध्ये दुबई कॅपिटल्सची जबाबदारी सांभाळणार आहे. ही लीग 20 फेब्रुवारी ते 16 मार्चपर्यंत चालणार आहे. वॉर्नरने यापूर्वीही अनेक टी-20 लीगचे नेतृत्व केले आहे. त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली 2016 मध्‍ये सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमध्‍ये विजेतेपद पटकावले होते. तर ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नरने आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी स्वीकारली होती.

T20 लीगबद्दल डेव्हिड वॉर्नर काय म्हणाला?

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर डेव्हिड वॉर्नर टी-२० लीगबद्दल म्हणाला, 'मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. याच्या आधारे मी एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत आहे. मी आज त्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेईन ज्यामुळे मला जगभरातील काही इतर (T20) लीगमध्ये जाऊन खेळता येईल.

डेव्हिड वॉर्नरला आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले आहे. ऋषभ पंत आगामी मोसमात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. जर तो परतला नाही तर तो पुन्हा एकदा दिल्लीचे कर्णधार होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT