esakal
क्रीडा

दीपक चाहर क्लिन बोल्ड, जया भारद्वाजसोबत अडकला लग्नबंधनात

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरगर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत लग्नबंधनात अडकला आहे.

धनश्री ओतारी

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरगर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गतवर्षी आयपीएलचा दुसरा टप्पा दुबईत पार पडला होता. त्यावेळी त्याने भर मैदानात जयाला प्रपोज करत लग्नाची मागणी केली होती. काल त्यांचा विवाह सोहळा पार पडला असून दीपकने मॅरेज गार्डन मध्ये जयासोबत लग्नगाठ बांधली.

दीपकने लग्नाचा खास फोटो शेअर करत आपण लग्नबंधनात अडकली असल्याची माहिती चाहत्यांनी दिली आहे.

यासोबत त्याने खास कॅप्शनदेखील दिली आहे. ''मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला वाटले की तू माझ्यासाठी बनली आहेस. आम्ही प्रत्येक क्षण एकत्र राहिलो आणि आताही एकत्र राहू. मी वचन देतो की मी तुला आनंदी ठेवीन. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. आम्हाला आशीर्वाद द्या.' असा क्यूट मेसेज त्याने कॅप्शनमधून जयाला दिला आहे.

मंगळवारी दीपक चाहर आणि जया भारद्वाज यांचा हळदी समारंभ पार पडला होता. दीपक चाहरच्या लग्नाला अनेकांनी उपस्थिती दर्शवली.

स्टेडिअममध्ये केले होते प्रपोज

गतवर्षी आयपीएलचा दुसरा टप्पा दुबईत पार पडला होता. सात ऑक्टोबर रोजी चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामना पार पडला. सामना संपल्यानंतर दीपक चाहरने स्टेडिअममध्येच प्रेयसी जया भारद्वाज हिला लग्नासाठी प्रपोज केले होते. दीपक चाहरनं गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. यावेळी, आजूबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांनाही शुभेच्छा दिल्या. जेव्हा दीपकला जयानं होकार दिला, त्यावेळी दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली.

कोण आहे जया भारद्वाज?

दीपक चाहरची पत्नी जया भारद्वाज दिल्लीमधील बारहखंबा येथे राहणारी आहे. बिग बॉस-5 (वर्ष-2011) मध्ये सहभाग नोंदवलेल्या अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहिण आहे. सिद्धार्थ MTV चा प्रसिद्ध शो स्पिल्ट्स विला सह इतर अनेक शोमध्ये दिसलाय. जया भारद्वाजने MBA केलेले आहे. जया एका टेलीकॉम कंपनीमध्ये डिजिटल प्लेटफार्म प्रमुख आहे. दीपक चाहर बहिण मालती चाहरमार्फत जयाला भेटला होता. तेथूनच दोघांमध्ये प्रामाचे अंकूर फुटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT