Wrestling 
क्रीडा

Wrestling : भारतीय कुस्ती संघटनेला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दणका!

सकाळ ऑनलाईन टीम

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यासह संकटात सापडलेल्या भारतीय कुस्ती संघटनेला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दणका देण्यात आला आहे. अनूज कुमार, चंदर मोहन, विजय, अंकित व सचिन मोर या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक पटकावलेल्या पाच कुस्तीपटूंना आशियाई क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेच्या निवड चाचणीत खेळू द्या, असा आदेश उच्च न्यायालयाकडून याप्रसंगी देण्यात आला आहे.

न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांच्या विशेष सुनावणीत महत्त्वाचा निर्णय घेतला. आशियाई क्रीडा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा एप्रिल महिन्यात ९ ते १४ या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन भारतीय कुस्ती संघटनेकडून करण्यात आले आहे. ही निवड चाचणी स्पर्धा १० व ११ मार्च रोजी होणार आहे.

अनुज कुमार याने २०२२मधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय कुस्ती संघटनेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेपेक्षा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक हे महत्त्वाचे ठरते. याशिवाय चंदर मोहन, विजय, अंकित व सचिन मोर या कुस्तीपटूंनीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांवर मोहोर उमटवली आहे. यानंतरही पाचही कुस्तीपटूंना डावलण्यात आले आहे.

याचिकाकर्त्यांकडून असे सांगण्यात आले आहे की, आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीची निवड चाचणी ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण यामध्ये चमकदार कामगिरी केल्यास पॅरिस ऑलिंपिकमध्ये पात्र ठरण्यासाठी बळू मिळू शकणार आहे.

उच्च न्यायालयाकडून भारतीय कुस्ती संघटनेच्या रेकॉर्डवर लक्ष टाकण्यात आले. त्या वेळी समजले की, निवड चाचणीसाठी अनेक पदकविजेत्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामुळे आता उच्च न्यायालयाने मंत्रालय व भारतीय कुस्ती संघटना यांना यामागील कारण विचारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT