dhananjaya de silva 
क्रीडा

Team India: वडिलांच्या हत्येनंतर बसला होता धक्का! मैदानात पुन्हा केलं जोरदार पुनरागमन, आता पाकविरुद्ध ठोकलं शतक

Kiran Mahanavar

Dhananjaya De Silva Sl vs Pak 1st Test : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी गाले येथे खेळवली जात आहे. सोमवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 312 धावा करून ऑलआऊट झाला. धनंजया डी सिल्वाने शानदार फलंदाजी शतक झळकावले. अँजेलो मॅथ्यूजनेही 64 धावा केल्या.

पाकिस्तानकडून डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद यांनी 3-3 बळी घेतले. प्रत्युत्तरात वृत्त लिहिपर्यंत पाकिस्तानने एका विकेटवर 40 धावा केल्या आहेत.

धनंजया डिसिल्वाची ही 50 वी कसोटी आहे. ज्यामध्ये त्याने 10वे शतक झळकावले आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याचे हे तिसरे शतक असून त्याने सर्वात मोठी खेळी खेळली. धनंजयने 214 चेंडूत 122 धावा केल्या. 12 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र 5 वर्षांपूर्वी धनंजयाला मोठा धक्का बसला होता. त्याच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

त्यावेळी त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली होती. मात्र, पहिल्या कसोटीनंतर तो पुन्हा संघात दाखल झाला. अष्टपैलू म्हणून त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे.

धनंजय डिसिल्वाच्या कसोटी विक्रमावर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 50 सामन्यांत 39 च्या सरासरीने 3152 धावा केल्या आहेत. 10 शतकांव्यतिरिक्त त्याने 11 अर्धशतकेही केली आहेत. 173 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

त्याने ऑफस्पिनर म्हणून 34 विकेट्सही घेतल्या आहेत. श्रीलंकेसाठी 76 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 10 अर्धशतकांच्या जोरावर 1653 धावा केल्या आहेत. 93 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. याशिवाय 41 विकेट्सही घेतल्या आहेत.

धनंजया डिसिल्वाच्या टी-20 आंतरराष्ट्रीय विक्रमाबद्दल बोलायचे तर त्याने 39 सामन्यात 3 अर्धशतकांच्या मदतीने 731 धावा केल्या आहेत. नाबाद 66 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. तसेच 13 विकेट्स आहेत. त्याने 20 शतकांच्या मदतीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तसेच 140 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT