dipika kumari sakal
क्रीडा

World Cup Archery : दीपिका कुमारीचे अपयश कायम; रिकर्व्हमध्ये भारतीय पदकविना

भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी मातृत्वानंतर पुन्हा तिरंदाजीतील आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

पीटीआय

येचॉन (दक्षिण कोरिया) - भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी मातृत्वानंतर पुन्हा तिरंदाजीतील आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र येथील विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील अनुक्रमे लीन सिह्यॉन आणि अलजेंद्रा वॅलेंन्सिया यांच्या वर्चस्वाला शह देऊ शकली नाही.

दीपिकाच्या या अपयशामळे रिकर्व्ह हा प्रकारातून भारतीय तिरंदाज रिकाम्या हाती परतणार आहे. हा रिकर्व्ह प्रकार हा ऑलिंपिकमधील महत्त्वाचा प्रकार आहे. रिकर्व्हमध्ये अपयश आलेले असले तरी भारतीयांनी कंपाऊंड प्रकारात एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी कामगिरी केली आहे.

शनिवारी झालेल्या कंपाऊंड प्रकाराच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने (ज्योती-परनीत-आदिती) सुवर्णपदक जिंकले होते तर मिश्र दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते; पण या पदकांमध्ये दीपिकाचा समावेश नव्हता.

दक्षिण कोरियाच्या २० वर्षीय लीन हिने या विश्वकरंडक स्पर्धेत दीपिकावर ६-२ (२८-२६, २८-२८, २८-२७, २७-२७) अशी मात केली. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या विश्वकरंडक तिरंदाजीतही लीनने दीपिकाचा पराभव केला होता. गेल्या महिन्यातील या विश्वकरंडक स्पर्धेत दीपिकाचा सरळ सेटमध्ये पराभव झाल्यामळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आज मात्र तिने दुसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये लीन हिला कडवी लढत दिली होती.

ब्राँझपदकाच्या लढतीतही दीपिकाची हार झाली. वॅलेंन्सियाकडून ती ४-६ (२६-२९, २६-२८, २८-२५, २७-२५, २६-२९) असे पराभूत झाली. या सामन्यात तीन- चार सेट जिंकण्याची धैर्य दाखवले होते; परंतु वॅलेंन्सियाला ती हरवू शकली नाही. दीपिकाविरुद्धच्या चार सामन्यात वॅलेंन्सिया हिचा हा दुसरा विजय आहे.

या मातब्बर खेळाडूंकडून झालेल्या पराभवामुळे दीपिकासाठी ऑलिंपिकपूर्वी धोक्याची घंटा वाजली आहे. चौथ्यांदा ती ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ती दक्षिण कोरियाचे माजी दिग्गज तिरंदाज किम ह्युन ताक यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. विश्वकरंडक स्टेज-३ ही स्पर्धा जूनमध्ये होत असून ती ऑलिंपिक पात्रतेसाठी अखेरची स्पर्धा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT