Dutee Chand esakal
क्रीडा

Dutee Chand : कॅन्सरवरील उपचारात घेतलेली औषधे पडली महागात? दुतीने डोपिंग प्रकरणात राज्य, केंद्र सरकारकडे मागितली मदत

अनिरुद्ध संकपाळ

Dutee Chand Doping Issue : एशियन गेम्समध्ये दोनवेळा रौप्य पदक पटाकावणारी भारताची धावपटू दुती चंदवर उत्येजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यावर चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. यानंतर दुती चंदने या प्रकरणात ओडिसा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आपली मदत करावी अशी विनंती केली आहे. (Dutee Chand Cancer)

राष्ट्रीय उत्येजक द्रव्य विरोधी संस्थेने (NADA) चंदवर चार वर्षाची बंदी घातली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोन डोपिंग टेस्टमध्ये चंदच्या रक्ताच्या नमुन्यात बंदी असलेलं उत्येजक द्रव्य सापडले होते. त्यानंतर तिच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली.

या कारवाईनंतर दुती चंदने एएनआयला प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, 'मला बंदीची बातमी काल सकाळी कळाली. मी निर्णयाला आव्हान दिलेली केस हरली आणि माझ्यावर चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. मला या निर्णयामुळे धक्का बसला तसेच खूप दुःख देखील झाले.'

'मी यापूर्वी देखील अनेक डोपिंग टेस्ट दिल्या आहेत. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. मी राज्य आणि केंद्र सरकारला तसेच नाडाला (NADA) मदतीसाठी विनंती केली आहे. मला विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत करण्यात यावी अशी विनंती मी केली आहे. मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही.'

नाडाने घातलेली बंदी ही या वर्षी 3 जानेवारी पासून लागू होणार आहे. दुतीच्या रक्ताचे नमुने हे 5 डिसेंबरला घेण्यात आले होते. या काळात पात्र झालेल्या स्पर्धांमधून तिला अपात्र करण्यात आले आहे. तिने मिळवलेली सर्व पदके, गुण आणि बक्षीसं देखील काढून घेण्यात येणार आहे.

चंदने सांगितले की तिला डॉक्टरांनी स्टेज 1 चा कॅन्सर झाला असल्याचे कळवले. तिने खेळातून निवृत्ती घेण्याची गरज आहे असेही डॉक्टरांचे मत आहे.

दुती म्हणाली की, 'माझ्या आयुष्यात जे काही होत आहे ते पाहून मी खूप घाबरले आहे. मी एमआरआय स्कॅन केला त्यावेळी डॉक्टरांनी मला स्टेज 1 चा कॅन्सर असल्याचे सांगितले. मी वेदना कमी होण्यासाठी काही औषधे घेत होते. मला ही औषधे उत्येजक द्रव्य असल्याचे माहिती नव्हते.'

27 वर्षाची दुती म्हणते की, 'माझ्या वकिलांनी माझा बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. माझ्या मते भारतात आतापर्यंत कोणत्याही खेळाडूवर 4 वर्षाची बंदी घालण्यात आलेली नाही. मला या निकालाविरूद्ध दाद मागण्यासाठी 21 दिवासांचा कालावधी मिळाला आहे. मी पुन्हा एकदा दाद मागणार आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

Latest Marathi News Updates : नळदुर्ग रोडवर चालत्या एसटी बसने घेतला पेट

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT