Rishabh Pant replies to Yuvraj Singh Tweet SAKAL
क्रीडा

Rishabh Pant ने युवराज सिंगच्या ट्विटला दिले चार शब्दात उत्तर, म्हणाला...

ऋषभ पंत सोबत युवराज सिंग 45 मिनिटं बोलला अन् इंग्रजांचे वाजवले बारा

Kiran Mahanavar

Rishabh Pant Yuvraj Singh Tweet : कसोटी क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कारकिर्दीतील पहिले शतक केले. पहिलं शतक हे कोणत्याही फलंदाजासाठी खास असतं. पण पंतची ही खेळी केवळ त्याच्यासाठीच नाही तर टीम इंडियासाठीही खास होती. पंतच्या नाबाद 125 धावांच्या जोरावर भारताने तिसरी वनडे 5 विकेटने जिंकली आणि इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली.

टीम इंडियाच्या मँचेस्टरमधील या विजयानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. पंतच्या संस्मरणीय खेळीनंतर युवराज सिंगने ट्विट करत लिहिले की, 45 मिनिट बोलण्याचा फायदा झालेला दिसतोय! पंत चांगला खेळलास जे व्हायरल झाले होते. याचा अखेर ऋषभ पंतने उत्तर दिले आहे. ऋषभ पंत उत्तर देत म्हणाला..., मी केल, खंरच युवी पा.

260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 72 धावांत चार विकेट गमावल्या होत्या, यानंतर पंड्या आणि पंत यांनी मिळून इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. पांड्याने 55 चेंडूत 71 धावा करून बाद झाला, तर पंत 113 चेंडूत 125 धावा करून नाबाद परतला. त्यानंतर भारतीय यष्टीरक्षकाने अधिक आक्रमक फॉर्म दाखवला. डेव्हिड विलीच्या एका षटकात 5 चौकार मारले, तर त्याने रूटच्या पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करून सामना आपल्या शैलीत संपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT