क्रीडा

IND vs ENG : आता फायलनमध्ये इंग्लंडसाठी टाळ्या वाजवा! बाद फेरीत टीम इंडिया नापास

इंग्लंडने भारताचा सेमी फायनलमध्ये तब्बल 10 विकेट्सनी पराभव करत वर्ल्डकपमधून पॅक अप केले

Kiran Mahanavar

India Vs England 2nd Semi Final T20 World Cup 2022 : इंग्लंडने भारताचा सेमी फायनलमध्ये तब्बल 10 विकेट्सनी पराभव करत वर्ल्डकपमधून पॅक अप केले. भारताने 169 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमावता पार केले. जॉस बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. तर अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या.

भारताचे 169 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने पॉवर प्लेमध्येच भारताला पराभवाच्या खाईत ढकलले. सलामीवीर जॉस बटलरने पहिल्या चेंडूपासून आक्रमक हल्ला चढवण्यास सुरूवात केली. त्यांनी 10 च्या सरासरीने धावा करण्यास सुरूवात केली. नंतर अॅलेक्स हेल्सने देखील बटरला साथ देण्यास सुरूवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 63 धावांपर्यंत मजल मारली.

पॉवर प्लेनंतर हेल्सने धडाकेबाज फलंदाजी करत आपले अर्धशतक आणि संघाचे शतक धावफलकावर लावले. त्यानंतर कर्णधार बटलरने देखील अर्धशतकी मजल मारली. या दोघांनी सामना लवकर संपवण्याच्या दृष्टीकोणातून फटकेबाजी सुरू केली. दरम्यान, बटरल शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला असता मात्र सूर्यकुमार यादवने झेल सोडला आणि भारताला एकमेव विकेट घेण्याची संधी होती ती देखील दवडली.

भारताची धावसंख्या मंदावली असताना भारताचा कुंफू पांड्या हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी करत भारताला 20 षटकात 6 बाद 168 धावांपर्यंत पोहचवले. त्याने 32 चेंडूत 63 धावांची खेळी केली. याचबरोबर विराट कोहलीने देखील अर्धशतकी खेळी करत हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. रोहित शर्माने 27 तर सूर्यकुमार यादवने 14 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

Godavari gold search: पैठणमधील गोदावरीच्या पाण्यात सोन्या-चांदीचा शोध सुरू! चाळण्या-टोपल्या घेऊन शेकडो नागरिकांची गर्दी, व्हिडिओ पाहा

Road Accident Kolhapur: कोल्हापुरातील हातकणंगले–कुंभोज मार्गावर दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू, अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद

Nagpur Crime: सख्ख्या भावाचे अत्याचार, १२ वर्षीय बहीण गर्भवती; मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून कृत्य

Malegaon Crime : मालेगाव पुन्हा हादरलं! 7 वर्षांच्या चिमुरडीसोबत नराधम अरिब अहमदचं संतापजनक कृत्य; संतापलेल्या नागरिकांनी भरचौकातच...

SCROLL FOR NEXT