England Former Captain Michael Vaughan Try To Trolled Wasim Jaffer After India Defeat ESAKAL
क्रीडा

Wasim Jaffer | ट्रोल करणाऱ्या इंग्लंडच्या वॉनला जाफरने 'दाखवला आरसा'

अनिरुद्ध संकपाळ

ENG vs IND : इंग्लंडने भारताला (England Vs India) पाचव्या कसोटीत सात विकेट्सनी मात देत गतवर्षीची मालिका बरोबरीत सोडवली. भारताने इंग्लंडला चौथ्या डावात विजयासाठी 378 धावांचे आव्हान दिले होते. हे मोठे आव्हान इंग्लंडने तीन विकेट्सच्या मोबदलात पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच पार करून इतिहास रचला. यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) वसिम जाफरला (Wasim Jaffer) ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या दोघांमध्ये कायम ट्विटर वॉर सुरू असते.

इंग्लंडने पाचवी कसोटी जिंकल्यानंतर मायकल वॉनने वसिम जाफरला टॅग करत 'मी फक्त ठिक आहेस का हे तपासतोय.' असे ट्विट केले. वॉनने असे ट्विट करून जाफरला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र वसिम जाफरने वॉनचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्याने वॉनच्या या खोडसाळ ट्विटला प्रत्युत्तर दिले. याचबरोबर ट्विटमधील एक चूक देखील दाखवून दिली. जाफर म्हणाला की, 'जोश दाखवत ट्विट करताना "तू" लिहायचेच विसरले, जरा स्कोअरलाईन तपासा ती 2 - 2 आहे.'

दुसरीकडे वॉनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मायकल वॉनने कोहलीला देखील ट्रोल करणारी पोस्ट शेअर केली. त्याने भारताचा माजी कर्णधार विराट आणि इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट यांची 2019 पासून तुलना केली. या दोघांनी कसोटीत 2019 पासून किती शतके केली याची आकडेवारी दिली.

वॉनने विराटबद्दल पोस्ट केली की, 'उल्लेखनीय, नोव्हेंबर 2019 ला विराट कोहलीने कसोटीत 27 शतके ठोकली होती. त्यावेळी जो रूटची कसोटी शतकांचा संख्या 17 होती. जुलै 2022 मध्ये विराट कोहलीची कसोटी शतकांची संख्या 27 वरच राहिली तर जो रूटने त्याला मागे टाकत 28 कसोटी शतके ठोकली. #ENGvsIND'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हातात पुजेची टोपली अन् मदतीसाठी महिलांच्या किंचाळ्या...वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील चेंगराचेंगरीचा थरारक VIDEO समोर

School Students Assault: भयंकर! इंग्लिश मीडियम स्कूलमधील २२ विद्यार्थ्यांवर अत्याचार, मुख्याध्यापकासह तिघांना अटक

MNS-MVA Morcha: लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली, शरद पवारांचे आवाहन

Mutual Fund : गेल्या 5 वर्षांत 20% पेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप लार्ज-कॅप म्युच्युअल फंड; पहा किती रिटर्न दिला!

Mumbai Morcha: मतदारयादी घोटाळा की मोठा राजकीय कट? ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाने बनावट अर्ज दाखल, Uddhav Thackeray म्हणाले...

SCROLL FOR NEXT