Shafali Verma
Shafali Verma ICC Twitter
क्रीडा

शफालीचा तोरा आणि पावसाच्या धाराच टीम इंडियाला वाचवू शकतील

सुशांत जाधव

इंग्लंडमध्ये दमदार रेकॉर्ड असलेल्या भारतीय महिला संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढाली आहे. पहिल्या डावात दमदार अर्धशत झळकावणारी स्मृती मानधना स्वस्तात माघारी परतली असून दुसरीकडे शफाली वर्मा दुसऱ्या डावातही अर्धशतकी खेळून मैदानात उभा आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी भारतीय महिला संघाने 1 बाद 83 धावा केल्या होत्या. शफाली 68 चेंडूत 55 धावा करुन नाबाद होती. तर दुसरीकडे दीप्ती 66 चेंडूचा सामना करुन 18 धावांवर खेळत होती. स्मृती मानधनाला दुसऱ्या डावात केवळ 8 धावांचे योगदान देता आले. भारतीय महिला संघ अजूनही 82 धावांनी पिछाडीवर असून या धावा करुन इंग्लिश महिलांसमोर त्या किती धावांचे टार्गेट ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (England Women vs India Women Shafali Verma and Deepti Sharmas partnership of 54 final session in Bristol is washed out Rain)

इंग्लंड महिलांनी पहिल्या डावात 396 धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय महिलांनी दमदार सुरुवात केली. स्मृती मानधना 78(155) आणि शफाली वर्मा 96(152) यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण या दोघी शतकी भागीदारी करुन परतल्यानंतर भारतीय महिला संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

पुनम राउत (2), शिखा पांडे (०), कर्णधार मिताली राज (2), उपकर्णधार हरमनप्रीत कौर (4) स्वस्तात माघारी परतल्या. दीप्ती शर्मा नाबाद 29 धावा करुन मैदानात उभी राहिली. पण तिला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. तानिया भाटिया (0), स्नेह राणा (2), पुजा वस्त्रारकर (12), झुलन गोस्वामी 1 धावा करुन बाद झाल्या. परिणामी भारतीय महिला संघाचा पहिला डाव 231 धावांतच आटोपला.

इंग्लंडमध्ये आतापर्यंत भारतीय महिला संघाने पराभूत झालेला नाही. सध्याच्या घडीला सामना जिंकणे भारतीय महिलांच्या हाताबाहेर आहे. पण सामना अनिर्णित राखण्यासाठी त्या धडपड करु शकतात. शफाली वर्माला आणखी काही वेळ मैदानात तग धरावा लागेल. त्याशिवाय मध्यफळीतील फलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडण्याची गरज आहे. इंग्लंडमध्ये पदार्पणातील सामन्यात शतक हुकलेल्या शफालीला पुन्हा एकदा शतकाची संधी आहे. चौथ्या आणि अखेरच्या दिवशी पावसाने उसंत घेतली तर तिची धावांची बरसात पाहायला मिळू शकते. सध्याच्या घडीला अडचणीत सापडलेल्या भारतीय महिला संघाला एकतर शफालीच्या धावांची बरसात वाचवू शकते नाहीतर पावसाच्या धाराच त्यांना पराभवापासून वाचवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT