Euro 2024 Sakal
क्रीडा

Euro 2024 : बेल्जियमच्या विजयाने चुरस वाढली; गटातील चारही संघांचे समान गुण

बेल्जियमच्या विजयात युरी टेलेमान्स याने पूर्वार्धात व कर्णधार केविन द ब्रह्न याने उत्तरार्धात प्रत्येकी एक गोल केला. टेलेमान्सचा गोल युरो करंडक इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोल ठरला.

सकाळ वृत्तसेवा

कलोन : फिफाच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमला युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत प्रारंभीच पराभवाचा धक्का बसला होता. मात्र त्यातून सावरत त्यांनी शनिवारी रात्री रुमानियावर दोन गोलने चमकदार विजय मिळविला.

परिणामी आता ‘ई’ गटात चुरस वाढली आहे. बेल्जियमच्या विजयात युरी टेलेमान्स याने पूर्वार्धात व कर्णधार केविन द ब्रह्न याने उत्तरार्धात प्रत्येकी एक गोल केला. टेलेमान्सचा गोल युरो करंडक इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोल ठरला.

रुमानिया, बेल्जियम, तसेच बाकी दोन संघ स्लोव्हाकिया व युक्रेनचे ‘ई’ गटात समान तीन गुण झाले आहेत. अखेरच्या साखळी फेरीत स्लोव्हाकिया व रुमानिया यांच्यात, तर युक्रेन व बेल्जियम यांच्यात लढत होईल. त्यांच्यातील विजेता संघ बाद फेरीत प्रवेश करेल.

पहिल्या फेरीत बेल्जियमला स्लोव्हाकियाने धक्का दिला होता, तर रुमानियाने युक्रेनला पराजित केले. नंतर युक्रेनने स्लोव्हाकियास हरवून आव्हान कायम राखले. युरो करंडकाच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत वेगवान गोल युरी टेलेमान्स याने सामना सुरू झाल्यानंतर ७३ व्या सेकंदास (१ मिनीट, १३ सेकंद) नोंदविला.

रोमेलू लुकाकूकडून मिळालेल्या चेंडूवर २७ वर्षीय खेळाडूने प्रतिस्पर्धी गोलरक्षक फ्लोरिन नित्सा याला चकविले. तासाभरानंतर लुलाकूचा गोल व्हीएआरद्वारे अवैध ठरल्यामुळे बेल्जियमचा हा हुकमी खेळाडू यंदा स्पर्धेत तिसऱ्यांदा दुर्दैवी ठरला.

रुमानियाच्या बचावफळीवर वारंवार दडपण आणलेल्या कर्णधार केविन द ब्रह्न याने ८० व्या मिनिटास बेल्जियमची आघाडी वाढविली. गोलरक्षक कोएन कॅस्टएल्स याने दुरवरून मारलेल्या फटक्यावर ३२ वर्षीय द ब्रह्न याने चेंडू नियंत्रित केला आणि नंतर रुमानियाचा बचाव भेदला.

‘‘आम्ही सामना जिंकल्याबद्दल मी खूप समाधानी आहे. हे तीन गुण मिळविणे खूप महत्त्वाचे होते. अर्थात, आम्ही काही संधीही गमावल्या. अगोदरच आम्ही वर्चस्व राखले असते तर आणखीनच चांगले झाले असते. मला वाटते की तीन, चार किंवा पाच गोल नोंदविणे आम्हाला शक्य होते. आम्ही अशा प्रकारच्या संधी निर्माण करत आहोत ही चांगली बाब आहे आणि आम्हाला संयम राखण्याची गरज आहे.’’

- डॉमेनिको टेडेस्को, बेल्जियमचे प्रशिक्षक

युरो करंडकातील पहिले तीन वेगवान गोल

- नेदिम बाजरामी – २३ सेकंद – अल्बानिया विरुद्ध इटली, २०२४

- दिमित्री किरिचेन्को – ६७ सेकंद (१ मिनीट, ७ सेकंद) – रशिया विरुद्ध ग्रीस, २००४

- युरी तिएलेमन – ७३ सेकंद (१ मिनीट, १३ सेकंद) – बेल्जियम विरुद्ध रुमानिया, २०२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT