FIFA World Cup qualifiers 2026 India News Marathi sakal
क्रीडा

FIFA World Cup qualifiers 2026 : भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर भुवनेश्‍वरमध्ये रंगणार! फिफा विश्‍वकरंडकाच्या पात्रता फेरीची तयारी

भारतीय फुटबॉल संघ २०२६ मध्ये होत असलेल्या फिफा विश्‍वकरंडकात पात्र ठरण्यासाठी सज्ज होत आहे. आगामी जून महिन्यात पात्रता फेरीच्या लढतींमध्ये कुवेत व कतार या दोन देशांविरुद्ध भारत लढणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

FIFA World Cup qualifiers 2026 : भारतीय फुटबॉल संघ २०२६ मध्ये होत असलेल्या फिफा विश्‍वकरंडकात पात्र ठरण्यासाठी सज्ज होत आहे. आगामी जून महिन्यात पात्रता फेरीच्या लढतींमध्ये कुवेत व कतार या दोन देशांविरुद्ध भारत लढणार आहे. त्याआधी भारतीय फुटबॉल संघासाठी सराव शिबिराचे आयोजन भुवनेश्‍वर येथे करण्यात आले आहे. १० मे रोजी सुरू होत असलेले हे शिबिर चार आठवडे सुरू राहणार आहे.

अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून सोशल मीडियावर माहिती देण्यात आली की, भुवनेश्‍वरमध्ये भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चार आठवडे हे शिबिर रंगणार आहे. येत्या २ जून रोजी कुवेतविरुद्धच्या लढतीसाठी भारताचा अंतिम संघ निवडला जाणार आहे.

भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. साखळी फेरीतील सहा लढतींनंतर गटातील दोन अव्वल संघ पुढल्या फेरीत पोहोचणार आहेत. चारही देशांच्या प्रत्येकी दोन लढती बाकी आहेत.

पात्रता फेरीची गुणतालिका (अ गट)

  • १) कतार - ४ सामने, ४ विजय, १२ गुण

  • २) भारत - ४ सामने, १ विजय, १ ड्रॉ, २ पराभव, ४ गुण

  • ३) अफगाणिस्तान - ४ सामने, १ विजय, १ ड्रॉ, २ पराभव, ४ गुण

  • ४) कुवेत - ४ सामने, १ विजय, ३ पराभव, ३ गुण

भारताच्या उर्वरित लढती

  • ६ जून - कुवेत (कोलकाता स्टेडियम)

  • ११ जून - कतार (अल रय्यान)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT