IND vs NZ Sakal Media
क्रीडा

IND vs NZ : या पाच कारणामुळं टीम इंडिया विजयापासून 'वचिंत'

याशिवाय अन्य कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे टीम इंडियाचा विजय हुकला त्यावर एक नजर....

सुशांत जाधव

रचिन रविंद्र आणि अजाझ पटेल या भारतीय वंशाच्या जोडीनं सामना वाचवण्यात सिंहाचा वाटा उचलला.

India vs New Zealand, 1st Test Match drawn : कानपूरच्या मैदानात न्यूझीलंडच्या संघाने जवळपास 45 वर्षानंतर सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाचे रेकॉर्ड उत्तम होते. 1999 मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला 8 विकेट्स राखून पराभूत केले होते. 2016 मध्ये याच मैदानात न्यूझीलंडवर 197 धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली होती. पाचव्या दिवसाच्या खेळात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला. पण न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीनं विकेट न देता टीम इंडियाच्या तोंडचा घास हिरावून घेतला. सामना अनिर्णत राखण्यात ते यशस्वी ठरले. रचिन रविंद्र आणि अजाझ पटेल या भारतीय वंशाच्या जोडीनं सामना वाचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. याशिवाय अन्य कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे टीम इंडियाचा विजय हुकला त्यावर एक नजर....

नाईट वॉचमनचा यशस्वी प्रयोग

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावात संयमी अर्धशतक झळकवणारा विल यंग अवघ्या दोन धावा करुन तंबूत परतला. अंपायरची चूक आणि रिव्ह्यू घेण्यासाठी झालेली दिरंगाई यामुळे न्यूझीलंडने पहिली विकेट नाहक फेकली. त्यानंतर नाईट वॉचमन म्हणून आलेल्या विल्यम सोमेरविलेनं टॉम लॅथमला उत्तम साथ दिली. पाचव्या दिवशी लॅथमने 2 (13) आणि सोमेरविले याने 0 (5) या जोडीनं डावाला सुरुवात केली. या जोडीने 31 षटके बॅटिंग केली. यात नाईट वॉचमन सोमेरविले याने 110 चेंडू खेळले. ही गोष्ट न्यूझीलंडला सामना वाचवण्यासाठी फायदेशीर ठरली.

केन विल्यमसन अन् लॅथमनेही दमवलं..

सोमेरविले तंबूत परतल्यानंतर टीम इंडियाला थोडा दिलासा मिळाला. पण त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने आपल्यातील संयम दाखवला. त्यानेही शंभरपेक्षा अधिक चेंडू खेळून काढत सामना अनिर्णित ठेवण्याच्या दिशने नेला. अर्धशतकी खेळी करणाऱ्या लॅथमने 146 चेंडू खेळले. या जोडीने जवळपास 19 षटके बॅटिंग केली.

शेवटच्या जोडीची चिवट खेळी

भारतीय वंशाच्या दोन हिरो टीम विजयात अडथळा बनून उभे राहिले. रचिन रविंद्र आणि अजाझ पटेल या जोडीने 50 चेंडूत 10 धावांची भागादारी केली. धावांपेक्षा त्यांनी 50 चेंडू धरलेला तग टीम इंडियाच्या विजयात मोठा अडथळा ठरला. तळाच्या फलंदाजीत रचिन रविंद्रनंही तब्बल 91 चेंडू खेळले. त्याची विकेट घेण भारतीय गोलंदाजांना जमलं नाही.

डाव घोषित करायला झालेला उशीर...

भारतीय संघाने डाव घोषित करायला थोडा उशीरच केला. कानपूरच्या मैदानात 240-50 टार्गेट चेस करणंही अवघडच गेले असते. पण टीम इंडियाने 284 ही धावसंख्या सेफ मानली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 71 व्या षटकातच दोनशेचा टप्पा पार केला होता. त्यापुढे टीम इंडियाने 10 षटके खेळली. यात 34 धावा करुन 284 धावांचे टार्गेट सेट केले. दोनशेचा टप्पा पार करुन डाव घोषित केला असता तर टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणखी 10 षटके मिळाली असती. एका विकेटसाठी ती पुरेशी ठरली असती.

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सलामीवीरांचा जलवा

भारतीय गोलंदाजांनी सामन्यात उत्तम गोलंदाजी केली. पण न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सलामी जोडीला लवकर बाद करण्यात टीम इंडिया अपयशी ठरली. टॉम लॅथम आणि विल यंगने पहिल्या डावात दीडशतकी भागीदारी रचली होती. ही जोडी जर लवकर फुटली असती तर टीम इंडियाचा विजय आणखी सुकर झाला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT