Lionel Messi
Lionel Messi  Twitter
क्रीडा

मेस्सी जैसा कोई नहीं... हॉटेलचं भाडं 17.50 लाख! रूमचे फोटो पाहाच

सुशांत जाधव

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे (Lionel Messi ) बार्सिलोनासोबतचे नाते संपुष्टात येताच तो युवा प्रतिभावंतांनी बहरलेल्या क्लबशी करारबद्ध झालाय. फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेन क्लबने मोठी किंमत मोजून मेस्सीला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. वर्षाला मेस्सीला जवळवास 35 मिलियन पाउंड (360 कोटी रूपये) मिळणार असल्याचे वृत्त असून हा सौदा त्याच्यासाठी खूप फायदाचा असल्याच्या चर्चा फुटबॉल विश्वात रंगल्या आहेत. त्यात आता आणखी एका चर्चेची भर पडलीये.

नव्या क्लबशी दोन वर्षांसाठी करारबद्ध झाल्यानंतर मेस्सी आपली पत्नी आणि तीन मुलांसह फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये वास्तव्यासही गेलाय. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, मेस्सी त्याची पत्नी अँटोनेला आणि तीन मुलांसह पॅरिसमधील Le Royal Monceau हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे.

या हॉटेलचे भाडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एका रात्रीसाठी या हॉटेलमध्ये जवळपास 17 लाख 50 हजार इतके भाडे आकारले जाते. पंचतारांकित हॉटेलमध्ये स्विमिंग पूल, सिनेमा हॉल आणि अनेक रेस्टोरंट असून हे हॉटेल फ्रान्समधील सर्वोत्तम मानले जाते. 2017 मध्ये ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमार ज्यावेळी PSG क्लबला जॉइन झाला होता त्यावेळी तो देखील याच अलिशान हॉटेलमध्ये वास्तव्यास होता.

विक्रमी सहावेळा बलोन डी आर या पुरस्कारचा मानकरी ठरलेल्या मेस्सीला सॅलरीशिवाय ब्रँड वॅल्यूच्या स्वरुपात वेगळी रक्कम मिळेल. PSG क्लबमध्ये सामील झाल्यानंतर तो आता 30 नंबरच्या जर्सीत खेळताना दिसेल. मेस्सीची PSG ची 30 नंबरची जर्सी साइटवरुन लॉन्च झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासात विकली गेली. याशिवाय मेस्सी करारबद्ध झाल्यानंतर त्याला बोनस स्वरुपात मिळालेली रक्कम ही क्रिप्टो करन्सीच्या स्वरुपात मिळाल्याची चर्चाही रंगली होती. त्याच्या ब्रँड नेममुळे अभासी चलनालाही चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT