Former Australian Wicketkeeper Peter Nevill
Former Australian Wicketkeeper Peter Nevill esakal
क्रीडा

ऑस्ट्रेलियाच्या माजी यष्टीरक्षकाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

सकाळ डिजिटल टीम

'मला माहितीय माझ्या कारकिर्दीचा शेवट जवळ आलाय. माझ्यासाठी हा एक निराशाजनक हंगाम होता.'

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पीटर नेव्हिलनं (Former Australian Wicketkeeper Peter Nevill) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. खांद्याच्या दुखापतीमुळं पीटर क्रिकेटपासून दूर होता. पीटरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 17 कसोटी सामने आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर अनुक्रमे 468 आणि 25 धावा आहेत.

पीटर म्हणाला, मला माहितीय माझ्या कारकिर्दीचा शेवट जवळ आलाय. माझ्यासाठी हा एक निराशाजनक हंगाम होता. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी दुखापतीमुळं अनेक सामने गमावलेत. पण, मला खूप अभिमान आहे. कारण, मी ऑस्ट्रेलियासाठी (Australia Cricket Team) खेळू शकलो. गेली इतके दिवस न्यू साउथ वेल्स संघाचाही मी भाग होतो. पण, मला वाटतं आता पुढं जाण्याची वेळ आलीय. त्यामुळंच मी निवृत्तीची घोषणा केलीय, असं त्यानं स्पष्ट केलं.

पीटरनं 2015 मध्ये अॅशेस (Ashes Series) खेळताना 45 धावा केल्या आणि तेव्हापासून नेव्हिल प्रसिद्धीच्या झोतात आला. नोव्हेंबर 2016 मध्ये होबार्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa Cricket Team) त्यानं शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तद्नंतर मॅथ्यू वेडनं संघात स्थान मिळवलं. पीटरनं कसोटी आणि टी-20 सामने खेळले, पण त्याला एकदिवसीय सामन्यात एकही संधी मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही, म्हणून समाजाच्या मनात रोष - नसीम खान

Guinness World Records' : पंडित धायगुडेंनी दुसऱ्यांदा रचले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ ; पोटावरून २७६ किलोंच्‍या १२१ दुचाकी ३७६ वेळा चालवत नेल्‍या

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT