MS-Dhoni-Attitude Sakal
क्रीडा

MS Dhoni : धोनीची उच्च न्यायालयात याचिका; IPS अधिकाऱ्याला खेचलं कोर्टात

आयपीएलमधल्या सट्टेबाजीशी संबंधित हे प्रकरण आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याने मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. एका आय़पीएस अधिकाऱ्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण आय़पीएलवरील सट्ट्याच्या संदर्भातील आहे.

२०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या घोटाळ्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली होती. या प्रकरणी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चेन्नई सुपर किंग्जही अडचणीत सापडला होता. या संघाचे काही अधिकारी सट्टेबाजीच्या प्रकरणी दोषी आढळले होते. याच प्रकरणाविषयी विधानं केल्यामुळे धोनीने एका आयपीएस अधिकाऱ्याला कोर्टात खेचलं आहे.

धोनीने 2014 मध्ये तत्कालीन पोलीस महानिरीक्षक (IG) संपत कुमार यांना मॅच फिक्सिंग आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी धोनीशी संबंधित कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी दिवाणी खटला दाखल केला होता. 100 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्याची विनंतीही त्याने न्यायालयाला केली होती. त्यानंतर न्यायालयाने 18 मार्च 2014 रोजी संपत कुमारला धोनीविरोधात कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखत अंतरिम आदेश दिला. तरीही संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायपालिका आणि त्यांच्या विरोधात राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ वकिलाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT