Sarfaraz Ahmed
Sarfaraz Ahmed esakal
क्रीडा

Sarfaraz Ahmed : पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने देशच सोडला; युकेमध्ये होणार स्थायिक?

अनिरुद्ध संकपाळ

Sarfaraz Ahmed Left Pakistan : पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद हा नुकताच ऑस्ट्रेलियावरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता. मात्र आता त्याने धक्कादायक पाऊल उचललं असून त्याने आपला देश सोडण्याची निर्णय घेतला. सरफराज खान पाकिस्तान सोडून युकेमध्ये स्थायिक झाला आहे. याबाबतचे वृत्त पाकिस्तानमधील अनेक माध्यमांनी दिलं आहे.

पाकिस्तानला 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या सरफराज अहमदचे सध्याच्या संघातील स्थान डळमळीत आहे. त्याची क्रिकेट कारकीर्दीत अनिश्चितता आली आहे. त्यामुळे त्याने देशच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जरी सरफराजने देश सोडला असली तरी तो पाकिस्तान सुपर लीगचा 9 वा हंगाम खेळणार आहे. त्यासाठी त्याने सराव सुरू केला आहे. तो क्वेट्टा ग्लॅडिएटरकडून खेळतो.

पाकिस्तानचा 36 वर्षाचा माजी कर्णधार सरफराजने जरी पाकिस्तान सोडून युकेमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला असली तरी तो पीसीबीसोबतचे व्यावसायिक संबंध कायम ठेवणार आहे.

मात्र सरफराजने अचानक हा निर्णय का घेतला हे मात्र समजू शकलेलं नाही. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये तो पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करत होता. मात्र त्यानंतर त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आलं. त्याला पाकिस्तानकडून फार कमी खेळण्याची संधी मिळाली. त्याने पाकिस्तानकडून शेवटचा मर्यादित षटकांचा सामना हा 2021 मध्ये खेळला होता.

सरफराज खानची कारकीर्द :

सरफराज अहमद पहिल्यांदा 2006 मध्ये प्रकाशझोतात आला होता. त्याने 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाचं नेतृत्नव केलं होत आणि वर्ल्डकप जिंकून दिला होता.

सरफराजने पाकिस्तानकडून 54 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 37.31 च्या सरासरीने 3031 धावा केल्या आहेत. त्याने 117 वनडे सामन्यात 33.55 च्या सरासरीने 2315 धावा केल्या आहेत. टी 20 बाबत बोलायचं झालं तर त्याने 818 धावा केल्या आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT