Rishabh Pant
Rishabh Pant esakal
क्रीडा

‘त्याला वजनामुळे खाली वाकता येत नाही...पंतवर पाकिस्तानच्या खेळाडूची टीका

धनश्री ओतारी

साऊथ अफ्रिकेविरुद्ध टी २० सीरीजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या एका खेळाडून त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने (Danish Kaneria) रिषभ पंतच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करत त्याला वजनामुळे खाली वाकता येत नाही असे म्हटलं आहे.

''मला त्याच्या फिटनेसवर शंका आहे. पंतला त्याच्या वजनामुळे नीट वाकता सुद्धा येत नाहीये. मी त्याचे सर्व निरीक्षण केले. त्याला वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर खाली वाकत सुद्धा नाही. तो आपल्या पायांच्या बोटांवरच बसतो. असे वाटते की त्याचे वजन जास्त असल्यामुळे त्याला बसल्यावर लवकर उभे देखील राहता येत नाही. अशी टीका करत तो १००% फिट आहे का?'' असा सवाल दानिश कनेरियाने उपस्थित केला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आणि पुढचे दोन सामने जिंकले, पण ऋषभ पंतची बॅट शांत राहिली.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील टी२० मालिका रोमांचक घडीवर होती. मात्र रविवारी (१९ जून) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अखेरचा टी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला, जो निर्णायक होता. पावसामुळे केवळ ३.३ षटकांचा खेळ होऊ शकला, ज्यामध्ये भारतीय संघाने २ विकेट्सच्या नुकसानावर २८ धावा केल्या. त्यानंतर पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यामुळे अखेर सामना रद्द करण्यात आला आणि मालिका २-२ ने बरोबरीत सुटली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT