Novak Djokovic
Novak Djokovic  esakal
क्रीडा

French Open : नोवाक जोकोविचची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅमची सुरुवात छान केली. त्याने पुरुष एकेरीच्या सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या ॲलेक्झँडर कोवासेविच याच्यावर ६-३, ६-२, ७-६ असा विजय साकारला आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला.

जोकोविच याने पहिला सेट ६-३ व दुसरा सेट ६-२ असा सहज जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही तो आघाडीवर होता. मात्र कोवासेविच याने जोकोविचची सर्व्हिस मोडीत काढत ६-६ अशी बरोबरी साधली. मात्र टायब्रेकमध्ये जोकोविचने आपला खेळ उंचावला आणि ७-६ अशी बाजी मारली. जोकोविचने ही लढत दोन तास व २६ मिनिटांमध्ये जिंकली.

स्लोएन स्टीफन्स हिने महिला एकेरीच्या लढतीत १६व्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा हिला पराभवाचा धक्का दिला. स्टीफन्स हिने प्लिस्कोवा हिच्यावर ६-०, ६-४ अशी मात केली. स्टीफन्स हिने एक तास व २४ मिनिटांमध्ये विजय संपादन केला. २०व्या मानांकित मॅडीसन कीज हिने केय कनेपी हिचे कडवे आव्हान ६-१, ३-६, ६-१ असे परतवून लावले.

कॅमेरुनचा झुंजीनंतर विजय

कॅमेरुन नोरी याने पाच सेटच्या कडव्या झुंजीनंतर विजय मिळवला. त्याने बेनॉईट पेअर याला पराभूत केले. कॅमेरुनने पहिला सेट ७-५ असा जिंकला. त्यानंतर मात्र पुढील दोन सेटमध्ये पेअर याने ६-४, ६-३ असे यश संपादन केले. कॅमेरुनने चौथ्या व पाचव्या सेटमध्ये ६-१, ६-४ अशा फरकाने विजय मिळवत झोकात पुनरागमन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT