Giripremi.jpg
Giripremi.jpg 
क्रीडा

कांचनजुंगा मोहीम फत्ते, गिरिप्रेमीने रचला इतिहास 

सकाळवृत्तसेवा

उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. या आधी २०१२ मध्ये माउंट एव्हरेस्ट, २०१३ मध्ये माउंट ल्होत्से, २०१४ मध्ये माउंट मकालू, २१०६ मध्ये माउंट धौलागिरी आणि माउंट च्यो ओयु व २०१७ मध्ये माउंट मनास्लुवर मोहीम यशस्वी

अशी कामगिरी करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव गिर्यारोहक मोहीम नेते 

या मोहिमेदरम्यान गिरिप्रेमीच्या १० गिर्यारोहकांसह ३० आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक माउंट कांचनजुंगावर चढाई करत आहेत, १५ मे सकाळी १० पर्यंत शिखर चढाई होणे अपेक्षित 

आंतरराष्ट्रीय मोहिमेचे बेस कॅम्पवरुन नेतृत्व व संयोजन झिरपे यांनी केले 

गिरिप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर व जितेंद्र गवारे यांनी शिखर चढाई केली

कांचनजुंगा इको इक्स्पेडीशन २०१९ ही भारतातील सर्वात मोठी व सर्वात पहिली यशस्वी नागरी मोहीम. 

एकाच दिवशी ३० च्या आसपास गिर्यारोहकांनी कांचनजुंगावर एकाच दिवशी चढाई करणे हा नवा विक्रम 

माउंट कांचनजुंगाविषयी  
उंची: ८५८६ मीटर 
माउंट एव्हरेस्ट व माउंट के २ नंतर उंचीनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर 
भारतातील सर्वात उंच शिखर 
भारत आणि नेपाळच्या सीमेवर वसलेले आहे 

कांचनजुंगाची पाच शिखरे: 
मुख्य शिखर: ८५८६ मीटर 
पश्चिम शिखर: ८५०५ मीटर 
मध्य शिखर: ८४८२ मीटर 
दक्षिण शिखर: ८४९४ मीटर 
कांगबाचेन शिखर: ७९०३ मीटर 

चढाईचे मार्ग: 
भारतीय बाजूचा मार्ग: कांचनजुंगा व झेमू ग्लेशियरच्या बाजूने (सध्या बंद)
नेपाळच्या बाजूचा मार्ग: यालुंग ग्लेशियरच्या मार्गे (गिरिप्रेमीच्या संघाची याच मार्गाने चढाई)

चढाईतील आव्हाने 

नेपाळ बाजूच्या यालुंग ग्लेशियर मार्गे चढाई करण्यात येते

बेसकॅम्पची उंची: ५४७५ मीटर 
कॅम्प १ ची उंची: अंदाजे ६००० मीटर 
कॅम्प २ ची उंची:  अंदाजे ६३०० मीटर 
कॅम्प ३ ची उंची: अंदाजे ६९०० मीटर   
कॅम्प ४ ची उंची:  अंदाजे ७५०० ते ७७०० मीटर 

बेसकॅम्प ते कॅम्प १ मार्ग: तीव्र बर्फाळ रिज 

कॅम्प १ ते कॅम्प २ मार्ग: ब्लू आईस (टणक बर्फ ज्यावरून चालणे व चढाई करणे अत्यंत अवघड) तसेच १०० मीटर्सची बर्फाची ७० ते ८० अंश कोनातील उभी भिंत

कॅम्प २ ते कॅम्प ३: दगडी भिंती, चढाई मोहिमेतील सर्वाधिक मृत्यू याच टप्प्यात 

कॅम्प ३ ते कॅम्प ४: प्रचंड हिमभेगा, सतत हालचाल होणारा भाग 

कॅम्प ४ ते शिखरमाथा: कॅम्प ४ ते शिखरमाथा ते पुन्हा कॅम्प ४ हा प्रवास तब्बल २४ ते २७ तासांचा, अत्यंत थकवणारा, 

माउंट एव्हरेस्टवर याच टप्प्यांमध्ये चढाई- उतराईसाठी तुलनेने कमी म्हणजे १४ ते १७ तास लागतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT