Greg Chappell statement Virat kohli is most complete Indian batsman  
क्रीडा

Virat Kohli : विराट सर्वांत परिपूर्ण भारतीय फलंदाज; ग्रेग चॅपेल

ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल यांची स्तुतिसुमने

सकाळ वृत्तसेवा

सिडनी : विराट कोहलीने रविवारी (ता. २३) झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशक्यप्राय असणारा विजय संघासाठी खेचून आणला, त्याची फलंदाजी खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारी होती; त्यामुळे मी त्याला सर्वात परिपूर्ण भारतीय फलंदाज समजतो, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.

विराटने टीकाकारांना चोख प्रतिउत्तर देत ८२ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. याच खेळीचे कौतुक करताना पत्रकारांशी संवाद साधताना चॅपेल म्हणाले, ‘‘त्याची ही खेळी दैवी होती. त्याच्या एवढी सुंदर फलंदाजी करून आणि सुंदर फटके मारून कोणीच फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मानसिकतेवर घात करू शकत नाही.’’

‘‘फक्त महान खेळाडूच कल्पनेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करू शकतात आणि विराट हा त्या महान खेळाडूंपैकी एक आहे. परिस्थितीनुसार फलंदाजी करण्यावर तो भर देतो. तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे अचूक आकलन करतो आणि मगच त्यांच्यावर हल्ला चढवतो. अत्यंत वेगाने येणाऱ्या चेंडूला फक्त मनगट वळवून जोरात मारणे हे आताच्या काळात फक्त विराट सारख्या फलंदाजालाच जमते,’’ असेही चॅपेल पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : फडणवीस-शिंदे वेगळे लढणार! भाजपच्या मंत्र्यांनीच दिला मोठा इशारा

Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Indian Destinations: भारतातील 'ही' 5 ठिकाणे परदेशापेक्षाही आहेत सुंदर, आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

Shocking Crime : संतापजनक ! आईच्या प्रियकराचा ८ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नशेच्या गोळ्या दिल्या अन्...

Dmart Sale : डीमार्ट तुम्हाला लुटतंय? DMart बाहेर आईस्क्रीम,पॉपकॉर्न विकणारे कोण असतात माहितीये? हे सिक्रेट पाहा नाहीतर खिसा होईल रिकामा

SCROLL FOR NEXT