Ravindra Jadeja WTC Final esakal
क्रीडा

Ravindra Jadeja WTC Final : ... तर रविंद्र जडेजा भारतीय संघाला, देशाला धोका देतोय; हरभजन असं का म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja WTC Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final सामन्यात भारताने आपल्या प्लेईंग 11 मध्ये फक्त 1 फिरकीपटू खेळवला. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल असणाऱ्या रविचंद्रन अश्विनला बेंचवर बसवत रोहितने रविंद्र जडेजाला अंतिम 11 मध्ये संधी दिली होती. दम्यान, ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात फलंदाजी करत असताना रविंद्र जडेजा विकेट घेण्यासाठी नाही तर धावा रोखण्यासाठी गोलंदाजी करत होता. यावरूनच समालोचक हरभजन सिंगने एक मूर्खपणाचे वक्तव्य केले.

हरभजन समालोचन करत असताना म्हणाला की, 'असा कोणताही गोलंदाज नाही जो फलंदाजाला धावा करण्यापासून रोखू शकले. जर तुम्ही तसा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काही काळानंतर धावा होणारच आहेत. जर रविंद्र जडेजा असं करत असेल तर तो देशाला आणि टीम इंडियाला देखील धोका देत आहे. एका फिरकीपटूचं काम हे धावा रोखणं नाही तर विकेट्स घेणं असतं.'

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले होते. मात्र पहिल्या दिवसाचा एक तास सोडला तर कांगारूंच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर कांगारूंच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. ट्रेविस हेडने 163 धावांची खेळी केली तर स्टीव्ह स्मिथने 121 धावा करत त्याला उत्तम साथ दिली.

भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवशी प्रभावी मारा केला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी विकेट घेण्याच्या दृष्टीने सकारात्मक मानसिकता दाखवली. यामुळे भारत कांगारूंचा डाव 469 धावांपर्यत संपुष्टात आणू शकला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT