AUS vs ENG Moeen Ali 
क्रीडा

AUS vs ENG Moeen Ali: अ‍ॅशेस कसोटी सामन्यादरम्यान मोईन अलीला मोठा झटका! ICC ने घेतली मोठी ॲक्शन

२ वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणारा मोईनला झाली मोठी शिक्षा

Kiran Mahanavar

AUS vs ENG Moeen Ali Fined : अ‍ॅशेसची पहिली कसोटी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जात आहे. आज टेस्टचा तिसरा दिवस आहे. आज आयसीसीने एक निवेदन जारी केले की, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. अलीला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

या सामन्यात तो आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. त्याला मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याची एका कसोटी सामन्याची फी 15 लाखांच्या जवळपास आहे आणि 25 टक्के दंड म्हणजे त्याला 3.75 लाख रुपये दंड भरावा लागेल. आयसीसीच्या निवेदनानुसार मोईनला अनुच्छेद 2.20 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहे.

खरं तर, पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या 89 व्या षटकात मोईनला क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेवर त्याच्या गोलंदाजीच्या हातावर ड्रायिंग एजंट लावताना दिसला होता. मोईनने गुन्हा कबूल केला आणि ICC एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीच्या अँडी पायक्रॉफ्टने प्रस्तावित केलेली शिक्षा मान्य केली, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नव्हती.

अॅशेस मालिकेतील पहिली कसोटी 16 जूनपासून सुरू झाली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने 61 तर जो रूटने सर्वाधिक 118 धावा केल्या. बेन स्टोक्स 1 धावा करून बाद झाला. इंग्लंडने पहिला डाव 393 धावांवर घोषित केला होता.

आता ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरू आहे. वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 362 धावा केल्या असून ते इंग्लंडपेक्षा फक्त 31 धावांनी मागे आहेत. आज पहिल्या कसोटीचा तिसरा दिवस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT