Yashasvi Jaiswal WI vs IND  esakal
क्रीडा

ICC Test Ranking : यशस्वी जैस्वालची ICC टेस्ट क्रमवारीत धमाकेदार एंट्री! कर्णधारचाही धमाका

सकाळ ऑनलाईन टीम

ICC Test Rankings Yashasvi Jaiswal : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि 141 धावांनी जिंकली. आता टीम इंडिया 20 जुलैपासून दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये उतरणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.

दरम्यान पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो पुन्हा एकदा आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील टॉप-10 मध्ये आला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा युवा खेळाडू यशस्वी जैस्वालने आयसीसी क्रमवारीत प्रथमच स्थान मिळवले आहे. तो 73 व्या स्थानावर आहे. यशस्वी जैस्वालने पहिल्या कसोटी सामन्यात 171 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली होती.

ताज्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन 883 रेटिंगसह पहिल्या क्रमांकाच्या विराजमान आहे. दुसऱ्या क्रमांकावर ट्रॅव्हिस हेड, ज्यांचे रेटिंग आता 874 आहे. बाबर आझम 862 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. म्हणजेच मागील आठवड्याच्या तुलनेत टॉप 3 मध्ये कोणताही बदल झालेला नाही.

गेल्या आठवड्यात ऋषभ पंत दहाव्या क्रमांकावर होता, पण आता रोहित शर्मा आला आहे. रोहित शर्माचे रेटिंग 729 वरून 751 वर पोहोचले आहे आणि ऋषभ पंत 750 रेटिंगवर आहे. म्हणजेच, फक्त एका रेटिंग पॉइंटचा फरक आहे. रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 103 धावांची शानदार खेळी केली होती. दुसरीकडे विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो 14 व्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात त्याचे रेटिंग 700 होते, ते आता 711 पर्यंत वाढले आहे.

कसोटी क्रमवारीत भारताचा रविचंद्रन अश्विन 884 रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा क्रमांक लागतो. गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत कागिसो रबाडा तिसऱ्या तर जेम्स अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. शाहीन आफ्रिदी पाच नंबर आहे.

यानंतर स्टुअर्ट ब्रॉड आणि रवींद्र जडेजा यांचा क्रमांक लागतो. रवींद्र जडेजाने तीन स्थानांनी झेप घेत थेट सातव्या क्रमांकावर आला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत फक्त रोहित शर्मा अव्वल 10 मध्ये आहे, तर तीन भारतीय खेळाडू गोलंदाजांमध्ये पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. जसप्रीत बुमराह 764 रेटिंगसह 10 व्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT