ICC Womens World Cup 2022  Sakal News
क्रीडा

VIDEO : कॅच ऑफ द मॅच; तिने दाखवली 'जॉन्टीवाली' झलक

सुशांत जाधव

ICC Womens World Cup 2022 : ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेत सलग चार विजयानंतर त्यांनी पराभव पाहिला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लॉरा वोल्वार्ट (Laura Wolvaardt) हिने 90 धावांची लक्षवेधी खेळी केली. तिच्याशिवाय कर्णधार सुने लुईस (Sune Luus) हिने अर्धशतकी खेळी साकारली. या दोघींच्या खेळीच्या जोरावर आफ्रिकेनं निर्धारित 20 षटकात 5 बाद 271 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाला रोखण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची गोलंदाजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लेनिंगसमोर Meg Lanning (c) फिकी पडली. तिने एकाकी किल्ला लढवत 135 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजयी मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेचा स्पर्धेत पहिला पराभव झाला असला तरी एश्लेग गार्डनर (Ashleigh Gardner) हिने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांची मनं जिकंली.

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 46 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जानसेन हिने संघाला पाचवे यश मिळवून दिले. ही विकेट खऱ्या अर्थात गार्डनर हिची होती. तिने कमालीचा झेल टिपल्याचे पाहायला मिळाले. हवेत झेपावत सुपर वुमनच्या तोऱ्यात तिने क्षेत्ररक्षणाचा अभूतपूर्व नजराणा दाखवून दिला.

दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना गमावला असला तरी सेमी फायनलमध्ये त्यांची दावेदारी प्रबळ आहे. पाच पैकी चार सामन्यातील विजयासह 8 गुण मिळवत दक्षिण आफ्रिका महिला संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित सामन्यात ते वेस्ट इंडीज आणि भारतीय महिला संघाला भिडतील. दोन्ही सामन्यातील एका विजयाने त्यांचा सेमीफायनल प्रवेश निश्चित होईल. जरी त्यांनी पुढचे दोन्ही सामने गमावले तरी त्यांना रनरेटच्या जोरावर सेमीचं तिकीट मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT