ICC Womens World Cup 2022 Points Table  Sakal
क्रीडा

CWC 2022 Point Table : पाकचा प्रत्येक विजय भारताच्या फायद्याचा

सकाळ डिजिटल टीम

ICC Womens World Cup 2022 Points Table : न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत गत विजेता इंग्लंडचा संघ सुरुवातीपासून संघर्ष करताना दिसला. पण मोक्याच्या क्षणी त्यांनी दमदार कमबॅक केले आहे. रविवारी झालेल्या लढतीत त्यांनी यजमान न्यूझीलंडला पराभूत करून चौथ्या क्रमांकावरील गणिते बिघडवण्याचे संकेत दिले आहेत. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या संघानी पहिल्या चारमधील आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. अखेरच्या स्थानासाठी आता भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरस निर्माण झालीये. यजमान न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडचा संघ 4 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहचला आहे. उर्वरित दोन सामन्यातील विजयासह ते सेमी फायनल गाठण्यासाठी प्रयत्नशील असतील.

मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने 5 पैकी दोन सामन्यातील विजयासह 4 गुण मिळवले आहेत. इंग्लंडपेक्षा अधिक रनरेट असल्यामुळे भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. भारत आणि इंग्लंड यांचे प्रत्येकी दोन सामने उरले आहेत. भारतीय महिला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला भिडणार आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध मैदानात उतरणार आहे. पाकिस्तान संघाने जर इंग्लंडला पराभूत केले तर भारतीय संघाचे सेमी फायनलचे तिकीट जवळपास पक्के होईल.

सेमीफायनलमध्ये कशी पोहचू शकते भारतीय महिला टीम

भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग उर्वरित दोन्ही सामने जिंकून सेमीफायनलचं तिकीट पक्के करणे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाली तरी त्यांना सेमी फायनलचा मार्ग खुला असेल. या परिस्थितीत त्यांना बांगलादेश विरुद्ध जिंकावे लागेल.

पाकिस्तान संघाची दमदार कामगिरी भारतासाठी ठरेल फायद्याची

पाकिस्तान महिला संघाचा सलामीच्या लढतीत भारतीय संघाने पराभव केला होता. या पराभवातून ते सावरलेच नाहीत. त्यांच्या पदरी सलग चार पराभव आले. आता उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवून ते स्पर्धेचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. पाकिस्तान संघाचे पुढील तीन सामने इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज विरुद्ध होणार आहेत. या सामन्यात पाकिस्तान संघ विजयी झाला तर भारतीय संघाचा सेमी फायनलचा प्रवास अगदी सोपा होईल.

भारत इंग्लंड न्यूझीलंडच्या एक पाउल पुढेच

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या निकालानंतर भारतीय महिला संघ 4 गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे. इंग्लंडच्या खात्यातही आता 4 गुण जमा झाले आहेत. एवढेच नाही तर न्यूझीलंडचा संघाच्या खात्यातही 4 गुण आहेत. पण भारत आणि इंग्लंडकडे न्यूझीलंडपेक्षा अक सामना अधिक आहे. त्याचा या दोन्ही संघांना फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडी

Smith Surpasses Dravid: ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' टेस्ट हरले, पण कर्णधार स्मिथने द्रविड-कोहलीला मागे टाकत रचले मोठे विक्रम

Nagpur Municipal Election : ...तर एकत्र लढणार ‘महाविकास आघाडी’; काँग्रेसकडून ३२ जागा सोडण्याची शक्यता

Viral Video: विराट कोहलीचा व्हिडिओ काढण्यासाठी एका ड्रायव्हरने लढवली अनोखी शक्कल, नेटकरी म्हणाले...

Crime News : 'पीडितेने जबाब बदलला तरीही...' मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला हायकोर्टाचा मोठा झटका

SCROLL FOR NEXT