ICC Women's World Cup England break losing streak  ESAKAL
क्रीडा

ENGW vs INDW: पोरींची कडवी झुंजी व्यर्थ; गतविजेत्यांनी उघडले विजयाचे खाते

सकाळ डिजिटल टीम

आयसीसी महिला वर्ल्डकप (ICC Women's World Cup) स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंड महिला क्रिकेट संघाने तब्बल तीन सामन्यानंतर आपले विजयाचे खाते उघडले. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडसमोर ठेवलेल्या 135 धावांचे माफक आव्हान इंग्लंडने 31.2 षटकात 6 फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 135 धावा चेस करतानाही घाम फोडला. मेघना सिंहने भेदक मारा करत इंग्लंडचे तीन मोहरे टिपले. त्यामुळे इंग्लंडला 135 धावा चेस करताना तीन फलंदाज खर्ची घालावे लागले. इंग्लंडची कर्णधार हेथर नाईटने दमदार अर्धशतकी (53) खेळी करत इंग्लंडचा पहिला विजय साकारला. तिला सिव्हरने 45 धावांची खेळी करून चांगली साथ दिली.

मात्र भारताने इंग्लंडला दोन धक्के दिल्यानंतर कर्णधार हेथर नाईट आणि सिव्हर यांनी डाव सावरत 65 धावांची भागीदारी रचून डाव सावरला. पूजा वस्त्रकारने सिव्हरला 45 धावांवर बाद केल्यानंतर एमी जोन्सने नाईटने 102 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र त्यानंतर मेघना सिंहने सोफिया डंक्ले आणि कॅथरिन ब्रंटला एकाच षटकात बाद केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 6 बाद 128 धावा झाली होती. परंतु कर्णधार नाईटने नाबाद अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला वर्ल्डकपमधील पहिला विजय साकारला.

दरम्यान, सलामीवीर स्मृती मानधनाची (Smriti Mandhana) 35 धावांची खेळी समाप्त झाल्यानंतर भारताची घसगुंडी उडाली. भारताची अवस्था 3 बाद 61 धावांवरून 7 बाद 86 अशी बिकट झाली. त्यामुळे भारत शंभरी तरी पार करू शकेल का अशी शंका निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर विकेटकिपर रिचा घोष आणि झुलन गोस्वामी यांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला शंभरच्या पार पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT