pak  sakal
क्रीडा

ICC World Cup 2023 : पाकच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव

मॉर्ने मॉर्केल पुढे म्हणाले, मागील दोन लढतींबाबत बोलायचे झाल्यास गोलंदाजांना दोन्ही बाजूंनी प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकता आलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर - पहिल्या दोन लढतींमध्ये विजय मिळवणारा पाकिस्तानचा क्रिकेट संघ पुढील दोन लढतींमध्ये भारत व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभूत झाला. यामुळे पाकिस्तानच्या एकदिवसीय विश्‍वकरंडकातील आव्हानाला हादरा बसला. यामुळे निराश झालेले पाकिस्तानी क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी गोलंदाजीत सातत्याचा अभाव असल्याचे स्पष्ट करतानाच गोलंदाजांनी दोन्ही बाजूंनी प्रभावी मारा केला नाही, अशी खंतही व्यक्त केली.

मॉर्ने मॉर्केल पुढे म्हणाले, मागील दोन लढतींबाबत बोलायचे झाल्यास गोलंदाजांना दोन्ही बाजूंनी प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकता आलेला नाही. गोलंदाजीत सातत्याने ठसा उमटवता आलेला नाही. भारतात सुरू असलेल्या विश्‍वकरंडकात जेतेपदाला गवसणी घालावयाची असल्यास आम्हाला यामध्ये सुधारणा करावीच लागणार आहे.

नसीमची उणीव भासते

मॉर्ने मॉर्केल यांनी याप्रसंगी वेगवान गोलंदाज नसीम शाह याची उणीव भासत असल्याचे आवर्जून सांगितले. ते म्हणाले, नसीम हा अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. शाहीन आफ्रिदी व नसीम हे दोनही गोलंदाज सुरुवातीला प्रभावी कामगिरी करतात. त्यामुळे पाकला प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवता येते; मात्र नसीमला दुखापतीमुळे या स्पर्धेमध्ये सहभागी होता आले नाही. याचा फटका आम्हाला बसत आहे.

हसन, हॅरिस यांना नवी भूमिका

नसीम शाह दुखापतीमुळे या स्पर्धेमध्ये खेळू शकला नाही. तो शाहीन आफ्रिदीसोबत सलामीला गोलंदाजी करायचा. त्याच्या अनुपस्थितीत हसन अली व हॅरिस रौफ यांना नव्या चेंडूवर गोलंदाजी करावी लागत आहे. याबाबत मॉर्ने मॉर्केल म्हणाले, नसीमच्या अनुपस्थितीत हसन व हॅरिस यांना नवी भूमिका दिली आहे. भारतात नव्या चेंडूने गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते. हॅरिस व हसन हे दोन्ही गोलंदाज भारतात कशाप्रकारे गोलंदाजी करायला हवी हे शिकत आहेत. दोघेही सर्वोत्तम प्रयत्न करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT