IND vs NZ  Twitter
क्रीडा

VIDEO : साउदीच्या उसळत्या चेंडूवर विराट गडबडला!

राखीव दिवसात विराट आणि साउदी यांच्यातील सामना रंगतदार होण्याचे संकेतच पाचव्या दिवशीच्या खेळात मिळाले आहेत.

सुशांत जाधव

ICC World Test Championship Final भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मेगा फायनल लढत आता राखीव दिवसांपर्यंत जाऊन पोहचली आहे. पाऊस आणि अंधूक प्रकाशाच्या खेळानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून शुभमन गिल आणि रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाने दोन विकेट्सही गमावल्या आहेत. दोन्ही सलामीवीरांना साउदीने तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. त्याला भेदक मारा करत साउदीने त्याचे स्वागत केले.

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 27 व्या षटकातील साउदीचा अखेरचा चेंडू विराट कोहलीने निर्धाव खेळून काढला. 29 व्या षटकात साउदी गोलंदाजी करत असताना कोहली स्ट्राईकवर होता. पहिल्या तीन चेंडूवर साउदीने कोहलीला आउट स्विंगने हैराण केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर साउदीने कोहलीला बाउन्सर मारला. हा चेंडू सोडताना कोहली चुकला. बॉल हेल्मेटवर लागला आणि भारतीय संघाच्या धावफलकात बाईजच्या रुपात चार धावा जमा झाल्या. त्याच्या पुढच्या चेंडूवर विराट कोहलीने तीन धावा घेतल्याचे पाहायला मिळाले. साउदीचा भेदक माऱ्यासमोर टीम इंडिच्या फलंदाजांना कुठेतरी संघर्ष करावा लागतोय, असेच चित्र पाहायला मिळाले.

राखीव दिवसात विराट आणि साउदी यांच्यातील सामना रंगतदार होण्याचे संकेतच पाचव्या दिवशीच्या खेळात मिळाले आहेत. या सामन्यापूर्वी 11 डावात विराटने साउदीचा सामना करताना 120 धावा केल्या आहेत. यात तीन वेळा साउदीने त्याला बाद केले आहे. त्यामुळे आता मेगा फायनलच्या राखीव दिवशी कोण भारी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT