rohit sharma with dinesh karthik
rohit sharma with dinesh karthik esakal
क्रीडा

रोहित आणि कार्तिकचे जुनं चॅट व्हायरल, जेव्हा हिटमॅनने कार्तिकला...

धनश्री ओतारी

आयपीएलच्या प्रदर्शनानंतर तीन वर्षानंतर दिनेश कार्तिकला टीम इंडियात संधी देण्यात आली. या संधीचे दिनेशने सोनं करत दक्षिण अफ्रिकाविरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात कमालीचे प्रदर्शन केलं. त्याने २७ चेंडूवर ५५ धावा करत पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याच्या या खेळीनंतर रोहित शर्मासोबतचे कार्तिकचे जुनं चॅट व्हायरल होताना दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात दिनेश कार्तिकने चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या T20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. कार्तिकने 27 चेंडूत 55 धावांची शानदार खेळी खेळली. 16 वर्षांनंतर कार्तिकने ही कामगिरी केली.

त्यानंतर रोहित आणि कार्तिकचे जुनं चॅट तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे जुनं चॅट?

इंस्टाग्रामवर सुटा बुटाच्या लुकमध्ये कार्तिकने गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ ला एक फोटो शेअर केला होता. त्याच्या या फोटोवर रोहित शर्माने मजेशीर कमेंट केली होती.

‘तुझ्या मध्ये अजून काही क्रिकेट बाकी आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतोय.’ असे रोहितने कमेंटमध्ये म्हटले होते. तर त्याला प्रत्युत्तर देताना दिनेश कार्तिकने, ‘होय त्यावर कधीही संशय घ्यायचा नाही.’ म्हटलं होते.

राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या सामन्यात कार्तिकने अप्रतिम खेळी केली. त्याने अवघ्या 27 चेंडूत 55 धावा करत भारताला 169 धावांपर्यंत नेले.

गेल्यावर्षी, कार्तिकने इंग्लंडमधील स्टेडियममधील त्याचा फोटो शेअर केला तेव्हा दोघांमध्ये हा संवाद झाला होता. तेव्हा कार्तिक द हंड्रेड फॉर स्काय स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करत होता. याशिवाय भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही त्याने कॉमेंट्री केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : MI चा पराभव मात्र टीम इंडियाला दिलासा! शेवट गोड लखनौनेच केला

मुलं हवीत की ‘रील स्टार’?

मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध!

महिला धोरणांचा प्रवास

अनुभवात्मक शिक्षण हवेच!

SCROLL FOR NEXT