क्रीडा

IND vs AUS : शेवटच्या कसोटीत प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल! कर्णधार रोहित 'या' खेळाडूंला देणार डच्चू

Kiran Mahanavar

India vs Australia, 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे. या मालिकेत टीम इंडियाचा पराभव होऊ शकत नाही. पण मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला अहमदाबादमध्ये होणारा चौथा कसोटी सामना जिंकावा लागेल.

टीम इंडियाने अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना जिंकल्यास घरच्या मैदानावर सलग 16वी कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला जाईल. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी देखील पात्र ठरेल. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवेल आणि प्लेइंग इलेव्हनमधील आपल्या बड्या खेळाडूंचा बळीही देईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल टीम इंडियाची सलामी देणार आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागेल. रोहित शर्मा सध्याच्या बॉर्डर गावसकर मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक 207 धावा करणारा फलंदाज आहे. चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये आहे, जिथे खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली मानली जाते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात फलंदाज चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरणार आहे. स्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर उतरेल. श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर उतरवले जाईल. अष्टपैलू रवींद्र जडेजा 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल, जो बॉल आणि बॅटने टीम इंडियाला मजबूत करेल.

फलंदाजीत फ्लॉप ठरत असलेल्या यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा बाहेर करू शकतो. केएस भरतचे विकेटकीपिंगही विशेष नाही. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा चौथ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केएस भरतच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला संधी देऊ शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इशान किशनच्या नावावर द्विशतक झळकावण्याचा विक्रमही आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या दोघांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करेल. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन बॉलसोबतच बॅटने टीम इंडियाला मजबूत करतील. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासोबत रवींद्र जडेजाही फिरकी गोलंदाजी करेल, तेव्हा हे तिन्ही घातक फिरकीपटू ऑस्ट्रेलियन संघाचा नाश करतील.

मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला वेगवान गोलंदाज म्हणून स्थान देईल. अशा स्थितीत उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागणार आहे. मोहम्मद शमी चौथ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT