ind vs aus odi australia got big blow jhye-richardson sakal
क्रीडा

IND vs AUS ODI: संघाला पुन्हा एकदा मोठा धक्का! दिग्गज खेळाडू वनडे मालिकेतून बाहेर

Kiran Mahanavar

India vs Australia ODI : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळल्या जाणार आहे. त्याचवेळी या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण संघाचा स्टार झाय रिचर्डसन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 मार्चला खेळल्या जाणार आहे.

BBL दरम्यान रिचर्डसनला दुखापत झाली होती, तो अद्याप बरा झालेला नाही. हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आल्याने 4 जानेवारीपासून रिचर्डसनने एकही सामना खेळला नाही. सुरुवातीला ही दुखापत किरकोळ असल्याचे मानले जात होते आणि तो BBL फायनलमध्ये परतेल अशी अपेक्षा होती, परंतु त्याला खेळण्यासाठी पूर्ण दोन महिने लागले.

17 मार्चपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी रिचर्डसनला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. रिचर्डसन बराच काळ दुखापतीशी झुंज देत आहे. 2019 मध्ये तो खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याच वेळी 2022 मध्ये तो श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळला नव्हता.

त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळू शकला नाही. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून त्याची बाहेर पडणे कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

ODI मालिकेसाठी दोन्ही संघांचे संघ

भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद . शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : पॅट कमिन्स, शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम स्मिथ झम्पा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT