ind vs aus odi series shreyas iyer ruled out of odi series against australia who is next in line  
क्रीडा

IND vs AUS : श्रेयस अय्यर वनडे मालिकेतून बाहेर! कोणत्या खेळाडूला मिळणार संधी? दावेदार आहेत तीन दिग्गज खेळाडू

सकाळ डिजिटल टीम

फलंदाज श्रेयस अय्यर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. अहमदाबादमधील चौथ्या कसोटीनंतर श्रेयसने पाठदुखीची तक्रार केली होती, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. आता त्याना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला देखील मुकावे लागले आहे. भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी यावृत्ताला दुजोरा दिला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. याचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात श्रेयस भारतीय संघाच्या डावात फलंदाजीला आला नव्हता. नंतर, बीसीसीआयने एक अपडेट जारी करत त्याला पाठीच्या खालच्या भागात दुखत असल्याचे सांगितले.

अशाच दुखापतीबद्दल त्याने यापूर्वीही तक्रार केली होती. पाठीच्या दुखापतीनंतरच श्रेयसचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात पुनरागमन झाले होता. मात्र त्याच समस्येने पुन्हा तोंड वर काढले आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप श्रेयसच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाही.

आयपीएलमधूनही बाहेर पडणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दुखापतीमुळे श्रेयस आयपीएलही खेळू शकणार नाहीये. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस या दुखापतीसह खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत केकेआरसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.

श्रेयस सध्या उपचारांसाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला आहे, परंतु त्याला जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासारखी शस्त्रक्रिया करावी लागेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. बुमराह, प्रसिद्ध आणि पंत हे आधीच आयपीएल 2023 मधून बाहेर पडले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

हे खेळाडू पर्याय असू शकतात

श्रेयस आऊट झाल्याने त्याच्या जागी कोण येणार याबाबत चर्चा सुरू आहे. या मालिकेसाठी संजू सॅमसन, रजत पाटीदार आणि दीपक हुडा यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. यानंतर, या तीनपैकी कोणत्याही एकाचा समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय राहुल त्रिपाठी हाही पर्याय असू शकतो.

काय म्हणाले क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप?

भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत मीडियाला सांगितले - दुखापती हा खेळाचा एक भाग आहे. आमच्याकडे सर्वोत्कृष्ट मेडिकल टीम उपलब्ध आहे आणि ते सर्व प्रकारे सक्षम आहेत. आमची एनसीएशीही चर्चा सुरू आहे. श्रेयस या मालिकेतून बाहेर पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT