IND vs AUS Team India 
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडिया पोहोचली नागपुरात, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड

जामठा स्टेडियमवर कसोटी असो वा वनडे सामना प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध भारताचे रेकॉर्ड

Kiran Mahanavar

IND vs AUS 2nd T20 Nagpur : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपुरात होणार आहे. दोन्ही संघांमधील सामना शुक्रवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू नागपुरात पोहोचले आहेत. मोहाली ते नागपूर या प्रवासाचा एक छोटा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जामठा स्टेडियमवर कसोटी असो वा वनडे सामना प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध भारताचे रेकॉर्ड नेहमीच चांगले राहिलेले आहे; मात्र टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी संमिश्र ठरली आहे. या मैदानावर झालेल्या चारपैकी दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळविला असून, दोन लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

२००९ पासून आतापर्यंत जामठा स्टेडियमवर विविध संघांमध्ये एकूण १२ टी-२० सामने खेळल्या गेले. भारतीय संघ चार सामने खेळला. यातील श्रीलंका (डिसेंबर २००९) आणि न्यूझीलंडविरुद्धच्या (मार्च २०१६) पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये यजमान भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली. जानेवारी २०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच धावांनी व नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या शेवटच्या लढतीत बांगलादेशचा ३० धावांनी पराभव केला.

उल्लेखनीय म्हणजे या मैदानावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत एकही टी-२० सामना खेळलेला नाही. याउलट कसोटी व वनडेमध्ये मात्र भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT