Ind vs Aus test Day 2 sakal
क्रीडा

IND vs AUS: ख्वाजा भाऊने रोहित सेनेला दिवसभर रडवलं! शेवटी शेपूटही वळवळलं

सकाळ डिजिटल टीम

Ind vs Aus test Day 2 : तीन सामन्यांतील कोरड्या खेळपट्टीचा धुरळा खरी धुळवड झाल्यावरच थांबला. अहमदाबाद कसोटी सामन्याकरिता तयार केलेल्या खेळपट्टीने फलंदाजांना कडेवर घेतले. उसळी नसणाऱ्‍या आणि गोलंदाजी करताना चेंडूचा टप्पा पडल्यावर संथ वेगाने येणाऱ्‍या खेळपट्टीने भारतीय गोलंदाजांची परीक्षा बघितली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 480 धावा केल्या.

आज ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सवर 255 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीननी पाचव्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. कॅमेरून ग्रीनने बाद होण्यापूर्वी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तो 170 चेंडूत 114 धावा करून बाद झाला. अश्विनने ग्रीनला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. त्याच षटकात अश्विनने अॅलेक्स कॅरीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीला खातेही उघडता आले नाही.

यानंतर ऑस्ट्रेलियाला 387 धावांवर सातवा धक्का बसला. रविचंद्रन अश्विनने मिचेल स्टार्कला झेलबाद केले. स्टार्कला सहा धावा करता आल्या. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून 409 धावा केल्या होत्या. चहापानानंतर पहिल्याच षटकात उस्मान ख्वाजाला अक्षर पटेलने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने 422 चेंडूत 180 धावा केल्या आणि आऊट झाला.

यानंतर नॅथन लियॉन आणि टॉड मर्फी यांनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. अश्विनने मर्फी (41) ला एलबीडब्ल्यू आणि नंतर लायन (34) कोहलीच्या हाती झेल देऊन ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपुष्टात आणला.

अश्विनने या डावात एकूण सहा विकेट घेतल्या. 32व्यांदा त्याने कसोटीत एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी त्याने भारतीय भूमीवर 26व्यांदा ही कामगिरी केली. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्यांदा कसोटीत एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. कांगारूंविरुद्धच्या कसोटीत त्याने आतापर्यंत 113 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनशिवाय शमीला दोन बळी घेतल्या. त्याचवेळी अक्षर-जडेजाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Marathwada Vidarbha : बंडखोर खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे शड्डू ठोकणार; मराठवाडा ते विदर्भ दौरा ठरला

Germany vs Ivory Coast: दोन गोल अपात्र ठरवले, तरी जर्मन्स नाही खचले; भरपाई वेळेत आयव्हरी कोस्टावर रोमहर्षक विजय

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

SCROLL FOR NEXT