IND vs BAN 2nd Test
IND vs BAN 2nd Test 
क्रीडा

IND vs BAN 2nd Test: बांगलादेशला मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीतून कर्णधार अन् घातक गोलंदाज बाहेर...

Kiran Mahanavar

IND vs BAN 2nd Test : आजकाल अनेक संघ खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहेत. आता असेच काहीसे भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत बांगलादेश संघात पाहायला मिळाले आहे. कारण बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन आणि वेगवान गोलंदाज इबादत हुसेन दुखापतीमुळे मीरपूर कसोटीतून बाहेर झाले आहेत. आता अशा स्थितीत यजमान बांगलादेशला दुसऱ्या कसोटीत अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

विशेष म्हणजे चट्टोग्राम येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दोन्ही स्टार खेळाडू जखमी झाले. त्यामुळे त्याने एकही षटक टाकले नाही. पहिल्या कसोटी सामन्यात शकीब अल हसन केवळ 12 षटके टाकली. त्याला एकदिवसीय मालिकेदरम्यान दुसऱ्या सामन्यात उमरान मलिकने दुखावल्यानंतर बरगडी आणि खांद्याचा त्रास होत असतानाही तो पहिल्या कसोटीत दिसला. क्रिकबझच्या मते, स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन पहिल्या कसोटीत खेळण्यास संकोच करत होता पण शेवटी त्याने खेळण्याचा निर्णय घेतला.

  • भारतीय संघ -

    केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, आर. अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, नवदीप सैनी, जयदेव उनाडकट, महम्मद सिराज, सौरभ कुमार, कोना भारत, कुलदीप यादव, अभिमन्यू ईश्वरन

  • बांगलादेश संघ -

    शकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, मुशफिकर रहिम, मोईनुल हक, मेहदी हसन, मोहम्मदूल हसन, अनामुल हक, खलीद अहमद, एबादोत हुसैन, शोफिफुल इस्लाम, तस्किन अहमद, तैजुल इस्लाम, नजमुल हुसैन, रेजुल रेहमान, झाकिर हसन, नुरुल हसन आणि यासीर अली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT