क्रीडा

'पनौती'मुळे हरलो! पराभवाला नेटकऱ्यांनी मोदींना धरलं जबाबदार

सकाळ वृत्तसेवा

India vs Belgium Hockey : ऑलंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमकडून पराभवाचा धक्का बसला. चार क्वार्टरपैकी पहिल्या तीनमध्ये भारतीय संघाने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, अखेरच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने खेळ उंचावत भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवासह भारतीय हॉकी संघाचं सुवर्णपदकाचं स्वप्नही भंगलं आहे. भारताच्या पराभवाला नेटकऱ्यांनी आणि काही लोकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कारणीभूत धरलं आहे. सोशल मीडियावर #Panauti हा ट्रेंडदेखील सुरु झाला आहे.

नेटकऱ्यांच्या मते, मोदी यांनी सामना पाहायला सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संघ बेल्जियमवर वर्चस्व गाजवत होता. मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचं कौतुक करत सामना पाहत असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर भारतीय संघाचा पराभवा झाला. असा युक्तीवाद नेटकऱ्यांनी लावला आहे. एनएआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना देवेंद्र सिंग यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आपण 2-1 ने आघाडीवर होतो. पण पनौतीने सामना पाहण्यास सुरुवात केली अन् आपण पराभूत झालो. काही लोकांनी मोदींच्या गुजरातमधील घरासमोर टिव्ही फोडत आपला राग व्यक्त केला. पाहा नेटकरी काय म्हणाले?

उपांत्य सामन्यात पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय हॉकी संघाचं मनोबल वाढवलं. पूर्ण स्पर्धेत चांगलं प्रदर्शन केल्याबद्दल संघाचं अभिनंदन करत पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. रोमांचक सामन्यात बेल्जियम संघाने भारतीय संघाचा 2-5 च्या फरकाने पराभव केला आहे. या पराभवासह भारतीय संघाचं गोल्ड जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. पण कांस्य पदकाची आशा अद्याप कायम आहे. ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यातील पराभूत संघासोबत भारतीय संघ कांस्यपदाकासाठी लढणार आहे. चार क्वार्टरमध्ये बेल्जियमला तब्बल 13 पॅनेल्टी शूट आऊट मिळाले. बेल्जियमने भारतीय संघावर दबाव करण्याचा प्रयत्न केला. बेल्जियमच्या आक्रमणाला भारतीय संघाने सडेतोड उत्तर दिले. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये भारतीय संघाने बेल्जियमवर दबाव निर्माण केला होता. मात्र, अखेरच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने तीन गोल करत भारताच्या सुवर्ण विजयाचे स्वप्न धुळीस मिळवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल

Maharashtra TET Exam Cancelled : 'टीईटी'चे गोपनीय साहित्य ट्रकमधून पुण्याला पाठविले; उत्तरपत्रिका-स्वाक्षरी पटाचा समावेश, प्रश्नपत्रिका जिल्हा कस्टडीत सुरक्षित

Ram Shinde : विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार : राम शिंदे

SCROLL FOR NEXT